Asia Cup 2023 Super Four India vs Sri Lanka, Playing XI:
आशिया कप 2023 स्पर्धेच सुपर फोरची फेरी सुरू झाली असून मंगळवारी (12 सप्टेंबर) भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध सामना होत आहे. कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भारताने या स्पर्धेत नुकताच पाकिस्तानविरुद्ध राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी (11 सप्टेंबर) 228 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता 24 तासांच्या आतच मंगळवारी (12 सप्टेंबर) भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल केला असून शार्दुल ठाकूर ऐवजी अक्षर पटेलला संधी दिली आहे. याशिवाय भारताने कोणताही बदल केलेला नाही. तसेच या सामन्यापूर्वी बीसीसीआयने माहिती दिली आहे की श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे या सामन्यातही खेळणार नसून तो संघासह स्टेडियममध्येही येणार नाही.
तसेच श्रीलंकेने मात्र, त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. त्यांनी बांगलादेशविरुद्ध सुपर फोरच्या सामन्यात खेळवलेला ११ जणांचा संघच भारताविरुद्धच्या सामन्यातही कायम केला आहे.
दरम्यान, मंगळवारी होणारा सामना महत्त्वाचा आहे, या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशाही भक्कम होणार आहेत. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांचा हा सुपर फोरमधील दुसरा सामना आहे.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
श्रीलंका - पाथम निसंका, दिमुथ करुणारत्ने, कुशल मेंडिस(यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा,चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसुन शनका(कर्णधार), दुनिथ वेललागे, महिश तिक्षणा, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.