IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध रोहित-गिलने हल्लाबोल अन् पावसाचा व्यतयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Asia Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी होत असलेल्या सामन्यात रोहित - गिलने अर्धशतके झळकावल्यानंतर पावसाचा व्यत्यय आला. यामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले.
India vs Pakistan Memes Viral
India vs Pakistan Memes ViralDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023 Super Four India vs Pakistan, Memes Viral: भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोरचा सामना खेळवला जात आहे. श्रीलंकेच्या कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियवर होत असलेल्या या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी दमदार कामगिरी केली.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजीला उतरले. या दोघांनी पहिल्या 15 षटकातच बिनबाद 115 धावा उभारल्या होत्या. यादरम्यान दोघांनीही अर्धशतकेही झळकावली.

दरम्यान, दोघांनीही सुरुवातीपासून आक्रमक शॉट्स खेळले. रोहितने पहिल्याच षटकात शाहिन आफ्रिदीविरुद्ध षटकार ठोकत धावांचे खाते उघडले होते. तर शादाब खानविरुद्धही त्याने चौकार-षटकारांची बरसात केली. तसेच शुभमन गिलने शाहिन आफ्रिदीविरुद्ध आक्रमक खेळताना तिसऱ्या आण पाचव्या षटकात मिळूनच 6 चौकार ठोकले.

India vs Pakistan Memes Viral
IND vs PAK: श्रेयस अय्यरने वाढवली टीम इंडियाची चिंता! पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचे खरे कारण आले समोर

रोहित आणि केएल राहुल यांनी सलामीला 121 धावांची भागीदारी केली. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. अनेकांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना ट्रोल केले आहे.

कारण भारत आणि पाकिस्तान संघात साखळी फेरीत झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती, त्यानंतर त्यांचे कौतुक झाले होते. तो सामना भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला होता. पण रद्द होण्यापूर्वी भारताने 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या होत्या.

पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या.

मात्र, साखळी फेरीतील दाखवलेल्या कामगिरीनंतर पाकिस्तानी गोलंदाजांकडून सुपर फोरच्या सामन्यातही चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात होती.

मात्र, भारतीय सलामीवीरांनी राखलेल्या वर्चस्वामुळे पाकिस्तानचे गोलंदाज सोशल मीडियावर ट्रोल झाले. तसेच सुपर फोरच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आल्याने यादरम्यान अनेक मजेशीर मीम्स सोशल मीडियावर पाहायला मिळाले.

India vs Pakistan Memes Viral
पावसाचे सावट असलेल्या IND vs PAK सामन्याला राखीव दिवसाचा दिलासा, पण काय आहेत नियम?

दरम्यान, रविवारी होत असलेल्या सामन्यादरम्यान देखील पावसाचा व्यत्यय आला. पावसामुळे सामना थांबला, तेव्हा भारताने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या आहेत. रोहितला 56 धावांवर शाबाद खानने बाद केले, तर शुभमन गिलला 58 धावांवर शाहिन आफ्रिदीने बाद केले.

रोहितने 49 चेंडूत केलेल्या या अर्धशतकी खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच शुभमन गिलने 52 चेंडूत केलेल्या खेळीत 10 चौकार ठोकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com