
India Vs Pakistan: पाकिस्तानने हाँगकाँगवरील शानदार विजयानंतर आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 टप्प्याचे वेळापत्रक स्पष्ट झाले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली संघाने शुक्रवारी हाँगकाँगवर 155 धावांनी दणदणीत विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. सुपर 4 मध्ये भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंका, पाकिस्तान पात्र ठरले आहेत.
दुसरीकडे, बांगलादेश (Bangladesh) आणि हाँगकाँगला पहिल्या टप्प्यात एकही सामना जिंकता न आल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. अ गटातून भारत आणि पाकिस्तान सुपर 4 साठी पात्र ठरले आहेत, तर ब गटातून अफगाणिस्तान (Afghanistan) आणि श्रीलंका यांनी पुढच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान गटात अपराजित राहिले आहेत.
दरम्यान, सुपर 4 मधील संघ स्पष्ट झाल्यानंतर अंतिम वेळापत्रकही समोर आले आहे. या टप्प्यात सर्व संघांना प्रत्येक संघाविरुद्ध राऊंड रॉबिनच्या आधारे एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 मधील पहिला सामना आज म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी श्रीलंका (Sri Lanka) आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे, तर भारत 4 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भारत पहिला सामना खेळणार आहे.
आशिया कप 2022 सुपर-4 वेळापत्रक
3 सप्टेंबर - अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका
4 सप्टेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान
6 सप्टेंबर - भारत विरुद्ध श्रीलंका
7 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान
8 सप्टेंबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान
9 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान
तसेच, सुपर 4 चे सर्व सामने IST संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होतील, तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.