Ashes 2023: 36 वर्षीय मोईन अलीचा जलवा, खास लिस्टमध्ये मिळवले स्थान!

Ashes 2023: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने नुकतीच निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. कॅप्टन बेन स्टोक्सने त्याला अॅशेससाठी मनवले होते.
Moeen Ali
Moeen AliDainik Gomantak
Published on
Updated on

Ashes 2023: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने नुकतीच निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. कॅप्टन बेन स्टोक्सने त्याला अॅशेससाठी मनवले होते. त्यानंतर त्याने अॅशेसमध्ये पुनरागमन केले. गेल्या दोन सामन्यात त्याला फलंदाजीत फार काही करता आले नसले तरी शेवटच्या सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

खास क्लबमध्ये सामील

मोईन सध्या मँचेस्टरमध्ये चौथा कसोटी सामना खेळत आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोईनने दुपारनंतर 44 चेंडूत 31 धावा केल्या. यासह त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील एक मोठा टप्पा गाठला. मोईनने केवळ कसोटीत 3000 धावाच पूर्ण केल्या नाहीत तर 200 बळींचा टप्पाही गाठला. हे करताच त्याने खास क्लबमध्ये स्थान मिळवले.

Moeen Ali
Ashes 2023: स्टुअर्ट ब्रॉडने गाठला 600 विकेट्सचा टप्पा, मुरलीधरन-वॉर्नच्या खास क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री!

मोईन अली चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला

मोईनने 67 व्या सामन्यात ही कामगिरी केली. अशाप्रकारे, तो सर्वात जलद 3,000 धावा करणारा अष्टपैलू आणि 200 बळी घेणारा चौथा खेळाडू ठरला. त्याच्याआधी शकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 54 कसोटीत, इयान बॉथमने 55 आणि ख्रिस केर्न्सने 58 सामन्यांत ही कामगिरी केली होती. अशी कामगिरी करणारा मोईन हा जगातील केवळ 16 वा खेळाडू आहे.

Moeen Ali
Ashes 2023: लीड्स कसोटीतही वाद पेटला! स्मिथ अन् बेअरस्टोमध्ये गरमा-गरमी; Video व्हायरल

इंग्लंडच्या खेळाडूंनी 3000 धावा आणि 200 विकेट्सचा दुहेरी जलवा

इयान बॉथम (5200 धावा, 383 विकेट)

अँड्र्यू फ्लिंटॉफ (3795 धावा, 219 विकेट)

स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) (3640 धावा, 600 बळी)

मोईन अली (3006* धावा, 201 विकेट)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com