IPL 2024 हंगाम कधी सुरू होणार? चेअरमननेच दिली मोठी अपडेट

IPL 2024 Schedule: आयपीएल 2024 हंगामाचे वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही, याबाबत आयपीएलचे अध्यक्ष अरुण धूमल यांनी माहिती दिली आहे.
IPL Captains
IPL CaptainsDainik Gomantak
Published on
Updated on

Arun Dhumal, chairman of IPL said BCCI working with Indian Government to plan schedules for 17th season during elections:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव गेल्यावर्षाच्या अखेरीसच पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता सर्व संघांची संघबांधणीही पूर्ण झाली आहे. परंतु, अद्याप आयपीएलच्या या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक समोर आलेले नाही. याबाबत आता आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी माहिती दिली आहे.

खरंतर यंदा भारतात लोकसभा निवडणूकही होणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या 18 व्या हंगामाच्या आणि लोकसभा निवडणूकांच्या तारखा सारख्याच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या हंगामाबाबत बरीच चर्चा होत आहे.

दरम्यान, यापूर्वी दोनवेळा आयपीएल लोकसभा निवडणूकांमुळे परदेशात खेळवण्यात आली आहे. त्याप्रमाणे यंदाही असे होणार का असा प्रश्न आहे. परंतु, धुमल यांनी स्पष्ट केले की यंदाचा पूर्ण हंगाम भारतातच खेळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

IPL Captains
Suryakumar Yadav: सूर्यकुमारवर जर्मनीत झाली सर्जरी! IPL मध्ये करणार पुनरागमन?

तसेच भारतीय सरकारबरोबर चर्चा सुरू असून निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकाबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

धूमल आयएएनएसशी बोलताना म्हणाला, 'यंदाचा हंगाम भारतातच खेळवण्याच्या दृष्टीने आम्ही भारतीय सरकारबरोबर आणि अन्य एजन्सीबरोबर चर्चा करत आहोत.'

'आम्ही लोकसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची वाट पाहात आहोत, जेणे करून आम्ही त्यानुसार योजना तयार करू. म्हणजे कोणते राज्य कोणते सामने कोणत्या वेळी आयोजिक करू शकतात, याची योजना आखता येईल.'

IPL Captains
MS Dhoni in Goa: IPL 2024 पूर्वी महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसह गोव्यात; फोटो, व्हिडिओ व्हायरल

तसेच त्यांनी सांगितले की 'मार्चच्या अखेरीस हा हंगाम सुरू होण्याती शक्यता आहे. लोकसभा निवडणूका एप्रिलमध्ये असणार आहेत, त्यामुळे आम्ही भारतीय सरकारच्या मदतीने वेळापत्रकाबाबत काम करत आहोत.'

दरम्यान, यंदाचा हंगाम 22 मार्चपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मे महिन्याच्या अखेरीस हा हंगाम संपू शकतो. कारण जूनच्या पहिल्याच आठवड्यात कॅरेबियन बेटे (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेत टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com