Arjuna Award 2022: कॉमनवेल्थ गाजवणाऱ्या खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस, वाचा संपुर्ण यादी एका क्लिकवर

Arjuna Award Latest News: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीने भारतीय क्रीडा जगतातील एक महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार असणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी काही खास खेळाडूंची यादी जाहिर केली आहे.
Arjuna Award 2022
Arjuna Award 2022Dainik Gomantak

भारतीय क्रीडा जगतातील एक महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार असणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीने काही खास खेळाडूंची शिफारस केली आहे. अलिकडेच झालेल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Gams 2022) स्पर्धेत कमाल कामगिरी करणाऱ्या विविध क्रीडा प्रकारातील 25 खेळाडूंची शिफारस करण्यात आली आहे. तसेच द्रोणाचार्य पुरस्कारासाठीही काही खास प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. तसेच कॉमनवेल्थ गाजवणाऱ्या टेबल टेनिसपटू शरथ कमलला खेळरत्न पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आले आहे.

भारतात खेळांची क्रेज पूर्वीपासून आहे. क्रिकेट (Cricket) मोठ्या प्रमाणात खेळला जातो. त्याची तितकीच लोकप्रियता असूनही इतर खेळांना देखील भारतात प्रेम दिले जाते. अलीकडे सोशल मीडिया (Social Media) आणि सर्वामुळे क्रिकेटशिवाय इतर खेळांनाही अच्छे दिन आले आहेत. टोक्यो ऑलिम्पिक्स, कॉमनवेल्थ गेम्स या अलीकडील स्पर्धांमध्ये तर भारतीय खेळाडूंनी केलेली कमाल पाहून भारतीय जनता क्रिकेटशिवाय इतर खेळांनाही तितकच प्रेम देऊ लागली आहे. त्यामुळे आता विविध खेळातील खेळाडूंचा मान वाढवण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेले खेळाडू जाहीर झाले आहेत.

  • अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केलेल्या भारतीय खेळाडूंची यादी

सीमा पुनिया (अॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अॅथलेटिक्स), अविनाश साबळे (अॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित पंघाल (बॉक्सिंग), निखत झरीन (बॉक्सिंग), भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञनंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), शुशीला देवी (ज्युडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बोल्स), सागर ओव्हाळकर (मल्लखांब), इलावेनिल वालारिवन (नेमबाजी), ओम प्रकाश मिथरवाल (शूटिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकूर (वेटलिफ्टिंग), अंशू मलिक (कुस्ती), सरिता मोर (कुस्ती), परवीन (वुशू), मनशी जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण धिल्लॉन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्नील पाटील (पॅरा स्विमिंग) , जर्लिन अनिका जे (पॅरा बॅडमिंटन)

रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना आजीवन श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाचे प्रशिक्षक सुजित मान, मोहम्मद अली कमर, तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग तेजा आणि रायफल प्रशिक्षक सुमा शिरूर यांची नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com