गोमन्तक डिजिटल टीम
म्हापसा येथील जागृत दैवत श्री देव बोडगेश्वर देवस्थानचा 88वा जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत, धार्मिक विधींनिशी पार पडला.
जत्रोत्सवानिमित्त गोड पदार्थ, खाजे, विविध वस्तूंची दुकाने मंदिरे प्रांगणात थाटली होती.
देवदर्शनानंतर भाविकांनी जत्रेमध्ये खरेदीचा आनंद लुटला.
प्रांगणात उभारलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानात आबालवृद्धांनी भेट देत आस्वाद घेतला
खेळण्याची दुकाने, विविध प्रकारचे खेळ, चक्रीपाळने आदींची उभारणीं सुद्धा दिसत होती
बोडगेश्वराचरणी बोललेला नवस पूर्ण झाल्यावर केळ्याचा घड अर्पण करण्याची प्रथा आहे.