

Arjun Tendulkar Batting Idol Yuvraj Singh: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर सध्या आयपीएल 2026 मुळे चर्चेत आहे. नेहमीच आपल्या वडिलांच्या नावाच्या दबावाखाली असणाऱ्या अर्जुनने एका पॉडकास्टमध्ये आपल्या मनातील गोष्टी उघडपणे मांडल्या. जेव्हा त्याला त्याच्या बॅटिंग आयडॉलबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने वडिलांचे नाव न घेता भारताचा माजी 'सिक्सर किंग' युवराज सिंहचे (Yuvraj Singh) नाव घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
अर्जुनने सांगितले की, त्याला युवीची निडर फलंदाजी आणि खेळण्याची शैली प्रचंड आवडते. मात्र, जेव्हा त्याच्या गोलंदाजीची तुलना झाली, तेव्हा त्याने हसत उत्तर दिले की, "युवराज फिरकीपटू होता आणि मी वेगवान गोलंदाज आहे."
आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी अर्जुनच्या संघात मोठा बदल झाला. मुंबई इंडियन्सने त्याला शार्दुल ठाकूरच्या बदल्यात लखनऊ सुपर जायंट्सकडे ट्रेड केले. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात असताना अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अनेकदा त्याला बेंचवरच बसावे लागले. यावर भाष्य करताना अर्जुन म्हणाला की, कोणताही खेळाडू बेंचवर बसणे पसंत करत नाही; प्रत्येकाला जास्तीत जास्त सामने खेळायचे असतात. मात्र, खेळाडूच्या हातात केवळ मेहनत करणे असते, जेणेकरुन संधी मिळताच तिचे सोने करता येईल. सध्या अर्जुन लखनऊच्या कोचिंग स्टाफसोबत जोरदार सराव करत असून आपल्या स्विंग गोलंदाजीने विरोधकांना चकवण्यासाठी सज्ज झाला.
अर्जुनने मुंबईची बलाढ्य टीम सोडून गोवा संघाकडून खेळण्याच्या आपल्या निर्णयावरही स्पष्टीकरण दिले. त्याने मान्य केले की, करिअरच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत आवश्यक होता. मुंबईच्या (Mumbai) संघात स्पर्धा इतकी जास्त होती की त्याला पुरेसे सामने मिळत नव्हते. एका तरुण खेळाडूच्या विकासासाठी मैदानात वेळ घालवणे आणि जबाबदारी घेणे महत्त्वाचे असते, म्हणूनच त्याने गोव्याचा मार्ग निवडला. अर्जुनसाठी हा आयपीएल हंगाम स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मानला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.