कोपा अमेरिका 2021 च्या अंतिम (Copa America 2021 Final) सामन्यात अर्जेंटिनाने (Argentina) नेमारच्या (Neymar) ब्राझीलचा (Brazil) पराभव करत 28 वर्षांनंतर कोपा अमेरिका किताब जिंकला आहे. अंतिम सामन्यात मेस्सी (Lionel Messi) च्या नेतृत्वात अर्जेंटिनाने ब्राझीलचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद जिंकले. 1993 नंतर प्रथमच अर्जेंटिनाचा संघ आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर प्रमुख विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला आहे. मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने दोनदा कोपा अमेरिकेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला परंतु दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पण यावेळी मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आणि विजय मिळविला. अंतिम सामन्यात, अर्जेंटिना आणि ब्राझीलने एक अद्भुत खेळ दर्शविला ज्याने चाहत्यांची मने जिंकली. सामन्याच्या 22 व्या मिनिटाला डी मारियाने गोल करुन अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. परंतु यानंतरही ब्राझीलच्या संघाने त्यांच्या हल्ल्याच्या खेळात कोणताही बदल केला नाही परंतु नशिब अर्जेंटिनाचे होते.(Argentina defeated Neymars Brazil to win the Copa America title after 28 years)
अंतिम सामना जिंकण्याबरोबरच मेस्सीसुद्धा खूप भावनिक झाला होता आणि विजयाच्या आनंदात मैदानावर बसलेल्या प्रत्येकाचे आभार मानले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये मेसी विजयानंतर भावूक दिसत आहेत.
ब्राझीलकडून 13 शॉट्सही टाकण्यात आले जेथे गोल करता आला असता पण प्रत्येक वेळी ब्राझीलचा संघ गोल करण्यात अपयशी ठरला आणि शेवटी अर्जेंटीना अंतिम सामन्यात जिंकू शकला. सामन्यादरम्यान 9 खेळाडूंना यलो कार्डसुद्धा दाखवले गेले जेणेकरुन सामन्याचा थरार किती तीव्र असेल याचा अंदाज येऊ शकेल. सामन्यात अर्जेंटिनाकडून पाच आणि ब्राझीलच्या चार खेळाडूंना यलो कार्ड दाखविण्यात आले.
मेस्सी यांना कोपा अमेरिका 2021 च्या सर्वोत्कृष्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताबही देण्यात आला. मेस्सीने या स्पर्धेत 4 गोल केले आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.