Goa Airport: गोव्यात रंगणार बुद्धिबळ,कॅरम स्पर्धा; देशभरातील खेळाडू दाखल

बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते उद्घाटन
Mauvin Godinho
Mauvin GodinhoD

वास्को: भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रादेशिक क्रीडा नियंत्रण मंडळ व विमानतळ क्रीडा नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विमानतळ बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

(All India Inter Airport Chess and Carrom Tournament inaugurated by Panchayat Minister Mauvin Godinho )

Mauvin Godinho
Goa T20: ...तर गोव्यात आयपीएलच्या धर्तीवर व्हेटरन क्रिकेट

वास्कोत आयोजित अखिल भारतीय विमानतळ आंतर बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत देशातील विविध विमानतळांवरून स्पर्धक भाग घेत असून या स्पर्धेत 6 संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघात 8 पुरुष आणि 8 महिला मिळून 16 स्पर्धकांचा समावेश असून स्पर्धेतील त्या 6 संघात उत्तर क्षेत्र (झोन), दक्षिण क्षेत्र, पूर्व क्षेत्र, पश्चिम क्षेत्र, उत्तरपूर्व क्षेत्र आणि सेंट्रल क्षेत्राचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतातील विविध विमानतळावरील 102 स्पर्धकांनी भाग घेतला असून स्पर्धा 16 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

वास्कोत आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर मान्यवरांशी मंत्री गुदीन्हो यांनी संवाद साधला. तसेच भारतातील विविध विमानतळावरील स्पर्धकांना घेऊन आयोजित केलेली ही स्पर्धा गोव्यात होत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. व सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा ही दिल्या.

Mauvin Godinho
Football Tournament: 'चर्चिल ब्रदर्स'ला नमवत 'राजस्थान'ची विजयी दौड कायम

या कार्यक्रमास पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांच्याबरोबर यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर उपस्थित होते. तसेच यावेळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांबरोबरच विमानतळ प्रादेशिक क्रीडा नियंत्रण मंडळाच्या अध्यक्ष माया लावण्या, दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com