टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने विराट कोहलीला टीम इंडियाचे कसोटी कर्णधारपद सोडताना ट्विट च्या माध्यमातून एक भावनिक प्रतिक्रिया दिली. कोहलीने सात वर्ष संघाचे नेतृत्व केल्यानंतर शनिवारी भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. इशांत आणि कोहली हे बालपणीचे मित्र आहेत. अशा परिस्थितीत इशांत शर्मा (Ishant Sharma) ने टीम इंडियाच्या माजी कर्णधारासाठी एक भावनिक ट्विट केले. त्यात म्हटले की, "ड्रेसिंग रूममध्ये, मैदानावर आणि मैदानाबाहेर एकत्रीत शेअर केलेल्या सर्व आठवणींसाठी धन्यवाद. आम्हाला कधीच वाटले नाही की तुम्ही आमचे कर्णधार व्हाल आणि मी भारतासाठी 100 कसोटी सामने खेळाल. आम्ही मनापासून क्रिकेट खेळलो आणि गोष्टी व्यवस्थित रित्या पार पडल्या."
यावेळी इशांतने कोहलीसोबत झालेल्या संभाषणाची आठवण करून दिली. जिथे त्याला माजी कसोटी कर्णधाराने परदेशात मालिका जिंकण्याची इच्छा सांगितली होती. इशांत म्हणाला की, 'मला अजूनही 2017 चा दक्षिण आफ्रिका दौरा आठवतो, जिथे तू मला सांगितले होते की या देशांमध्ये मालिका जिंकण्याची वेळ आली आहे. पण 2017-18 मध्ये झालेली आफ्रिकेतील (Africa) मालिका आम्ही जिंकली नाही, पण ऑस्ट्रेलियातच ऑस्ट्रेलियाला (Australia)हरवले. इंग्लंडमध्ये (England)2017-18 मध्ये आम्ही मालिका हरलो होतो, पण आम्हाला हे माहीत की एक संघ म्हणून आम्ही त्यांच्या किती जवळ आलो आहे. सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारपदाबद्दल अभिनंदन आणि कर्णधार म्हणून तुम्ही आम्हाला दिलेल्या अद्भुत आठवणींसाठी धन्यवाद.
कसोटी सामन्यांमधील यशस्वी कर्णधार
कसोटी क्रिकेटमध्ये 2018-19 या वर्षात कोहलीच्या (Virat Kohli)नेतृत्वात टीम इंडियाने सर्वात मोठा विजय नोंदवला. भारताने 2022 मध्ये शुक्रवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa)तीन सामन्यांची कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने कसोटी सामण्यांचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. त्याच्या नेतृत्वात भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या अंतिम फेरी पर्यंत पोहोचला. कोहलीने भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक 68 वेळा कर्णधारपद (Captain) भूषवले. यादरम्यान संघाने 40 कसोटी सामने जिंकले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.