Mirabai Chanuने दोन वर्षांनंतर खाल्ले घरचे जेवण

टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympic) बहुतेक भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक असली तरी मीराबाई चानूनेही (Mirabai Chanu) संपूर्ण देशाला आनंद देण्याची संधी दिली आहे.
Mirabai Chanu
Mirabai ChanuTwitter/@mirabai_chanu
Published on
Updated on

टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympic) बहुतेक भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक असली तरी मीराबाई चानूनेही (Mirabai Chanu) संपूर्ण देशाला आनंद देण्याची संधी दिली आहे. आता प्रत्येक देशवासियांना चानूच्या यशाबद्दल नेहमीच अभिमान वाटेल. ऑलिम्पिक 2020 मध्ये 49 किलोग्राम गटात रौप्य पदक (Silver medal) जिंकून तिने पहिले पदक जिंकून भारताचे गौरव केले. ज्यानंतर आता त्यांची चर्चा जगभर सुरू आहे.(After a long wait of 2 years, Mirabai Chanu eat home food)

Mirabai Chanu
IND vs SL: कुणाल पांड्यानंतर आणखी दोन खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

घरी परत आल्यावर मीराबाईंनी तिच्या ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती घरी जेवण करत आहे. पण या फोटोमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ती 2 वर्षांनंतर घरचे अन्न खात आहे. हा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर करताना तिने लिहिले की 2 वर्षांचे घरचे जेवण खाल्ल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हास्य आले पाहिजे.या फोटोमध्ये मीराबाई चानू जमिनीवर बसून जेवण करताना दिसत दिसत आहे.

आता तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्सनेही मनाला चटका लावणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. एका यूझर्सने सांगितले की आम्हाला तुमचा अभिमान आहे, तर काहींनी असे लिहिले की पदक असे मिळवले जात नाही. तर दुसऱ्या यूझर्सने सांगितले की एका सामान्य मुलीने असामान्य यश मिळवले आणि दाखवून दिले की प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com