सात्विक-चिराग जोडी हिट, BWF क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवून रचला इतिहास!

Satwiksairaj Rankireddy And Chirag Shetty: देशातील अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मोठी कामगिरी केली आहे.
Chirag Shetty And Satwik Sairaj
Chirag Shetty And Satwik Sairaj Dainik Gomantak
Published on
Updated on

Satwiksairaj Rankireddy And Chirag Shetty: देशातील अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्यांदाच BWF जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

देशाची ही स्टार जोडी गेल्या काही दिवसांपासून चमकदार कामगिरी करत होती. गेल्या आठवड्यातच या जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन सुवर्णपदक जिंकले होते.

BWF च्या मते, सात्विकसाईराज आणि चिराग या जोडीने इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अॅड्रिएंटो यांना मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांचे सध्या 92,411 गुण आहेत.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या (India) स्टार जोडीने दक्षिण कोरियाच्या खेळाडूंवर विजय मिळवला होता. सात्विकसाईराज आणि चिराग यांनी अंतिम सामन्यात सोल ग्यु चोई आणि वोन हो किम यांचा पराभव केला.

सात्विकसाईराज आणि चिराग या जोडीपूर्वी प्रकाश पदुकोण, सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी देशासाठी अव्वल मानांकन मिळवले आहे.

Chirag Shetty And Satwik Sairaj
आता मिशन गोल्ड! Satwik - Chirag ने रचला इतिहास, 'हा' कारनामा करणारी भारताची जोडी नंबर वन

भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे की, 'सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने दोन स्थानांनी झेप घेत BWF जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ही पहिली भारतीय जोडी आहे.'

Chirag Shetty And Satwik Sairaj
Asian Games 2023: भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास, प्रथमच रौप्य पदक जिंकले

सात्विक-चिराग जोडी हिट:

सात्विक-चिरागची जोडी नेहमीच हिट ठरली आहे. 2018 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र सांघिक स्पर्धेत त्यांनी भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले होते.

यानंतर, या जोडीने 2019 मध्ये BWF वर्ल्ड टूरमध्ये चांगली कामगिरी केली आणि विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली होती.

या भारतीय जोडीने अंतिम सामन्यात ली जुनहुई आणि लियू युचेन या चिनी जोडीचा पराभव करुन थायलंड ओपनचे विजेतेपद पटकावले होते.

सात्विक-चिराग या जोडीने एकत्र खेळताना अनेक पुरस्कार पटकावले आहेत. अलीकडेच, त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकून दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com