जम्मू-काश्मीरसाठी शिंप्याच्या मुलाने सायकलिंगमध्ये जिंकले पहिले सुवर्ण, वाचा संघर्षाची कहाणी

आदिल अल्ताफने खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये जम्मू आणि काश्मीरसाठी सायकलिंगमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास
Adil Altaf
Adil AltafTwitter
Published on
Updated on

आदिल अल्ताफने खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये जम्मू आणि काश्मीरसाठी सायकलिंगमध्ये (Cycling) पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. श्रीनगरमध्ये शनिवारी एका शिंप्याच्या मुलाने 70 किमी रोड रेस जिंकली. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी त्याचे अभिनंदन केले. याचबरोबर त्याने आदल्या दिवशी 28 किमी शर्यतीत रौप्य पदकसुद्धा जिंकले. (Adil Altaf Jammu and Kashmir)

अल्ताफसाठी शनिवारी हा एक महत्त्वपूर्ण विजय होता कारण त्याला सिद्धेश पाटील (महाराष्ट्र) आणि दिल्लीच्या अर्शद फरीदी यांच्यासह अधिक उत्साही सायकलपटूंनी आव्हान दिले होते. मात्र त्याच्या जिद्दीच्या जोरावर अल्ताफने विजय आपल्या नावावर केला. 'माझ्यासाठी हा मोठा क्षण आहे. चांगली कामगिरी करण्याच्या आत्मविश्वासाने मी येथे आलो आहे,'असे विजयानंतर अल्ताफ म्हणाला.

Adil Altaf
पाकिस्तानचे टॉप-5 मध्ये स्थान पक्के तर दुसरीकडे भारतीय संघाचे मोठे नुकसान

लहानपणी अल्ताफ मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील लाल बाजारच्या गल्लीबोळातून सायकल चालवत असे. त्याला त्याच्या खेळाची आवड असली तरी तो सायकल चालवायचा आणि त्याच्या शिंपी वडिलांच्या व्यवसायासाठी लागणारे सामान सायकलवरून पोहोचवायचा.

जेव्हा तो 15 वर्षांचा झाला तेव्हा त्याने प्रथमच त्याच्या शाळेत, हार्वर्ड, काश्मीर येथे झालेल्या सायकलिंग स्पर्धेत भाग घेतला होता. तिथेच त्याने सायकलिंगला गांभीर्याने घेतले आणि यातच करिअर करायचे ठरवले.

Adil Altaf
IPLची कमाई इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा जास्त, सौरव गांगुलीचा मोठा दावा

त्याच्या गरीब वडिलांनी मात्र त्याला मोठे प्रोत्साहन दिले. परिस्थिती हालाखिची असून आपल्या मुलाचीआवड जोपासण्यासाठी त्याला सायकल विकत घेवून देण्यासाठी अल्ताफच्या वडिलांनी दुप्पट मेहनत घेतली. स्वत:ची सायकल घेतल्यानंतर अल्ताफने स्थानिक स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली. त्याचे हे यश आणि जिद्द बघून, श्रीनगरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्या मदतीसाठी पुढे आली. 18 वर्षीय अल्ताफ गेल्या सहा महिन्यांपासून एनआयएस पटियाला येथे खेलो इंडिया गेम्ससाठी तयारी करत होता. आणि आज त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com