टोकियो (Tokyo) ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सतत चर्चेत असतो. नीरज चोप्राने अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नेमबाज आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रासोबत (Abhinav Bindra) दिसत आहे. या फोटोमध्ये आणखी एक खास गोष्ट दिसून येत आहे.
ती म्हणजे अभिनव बिंद्राने नीरज चोप्राला एक खास भेटवस्तू दिली. ती वस्तू अभिनवने नीरजला एक पप्पी भेट दिला आहे, ज्याचे नाव 'टोकियो' आहे. कनेक्शन असे आहे की नीरजने टोकियोमध्येच त्याचे ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले.
नीरज चोप्राने त्याच्या पोस्टमध्ये, 'अभिनव बिंद्रा सर आणि त्यांच्या कुटुंबासोबत एक अद्भुत वेळ घालवण्याची संधी मला मिळाली. बीजिंगमधील एका ज्येष्ठ व्यक्तीच्या सुवर्णपदकाची ओळख करून दिली आणि बिंद्रा कुटुंबाच्या पाहुणचाराचा आनंद मला घेता आला. चोप्रा कुटुंबातील नवीन सदस्य 'टोकियो' मला भेट दिल्याबद्दल धन्यवाद," असे लिहीले.
अभिनव बिंद्रा यांनीही या भेटीबद्दल एक ट्विट केले. त्याने त्यात, "प्रोग्रेसच एक ध्येय आहे, गोल्ड मेडल ही प्रोसेस आहे. युवा सुवर्णपदक विजेत्याबरोबर वेळ घालवला त्याबदद्ल मला आनंद झाला," असे लिहिले.
यावर्षी ऑगस्टमध्ये नीरज चोप्राने जपानच्या टोकियोमध्ये इतिहास रचला. भालाफेक मध्ये 23 वर्षीय नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले, त्याने 87.58 मीटर अंतरावर भाला फेकला. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने विक्रमी कामगिरी केली आणि नीरज चोप्रा एकमेव सुवर्णपदक विजेता ठरला.
नेमबाज अभिनव बिंद्राने सुद्धा 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. दोन्ही खेळाडू एकेरी स्पर्धेत सुवर्णपदके जिंकणारे स्टार खेळाडू आहेत. मात्र या काही दिवसात नीरज चोप्रा भारतात परत आल्यापासून तो स्टार बनला आहे.
नीरज चोप्रा सतत अनेक कार्यक्रमांमध्ये गुंतलेला असतो, आता तो टीव्ही जाहिरात देखील करत आहे आणि याशिवाय नीरज चोप्रा अनेक टीव्ही शोमध्ये देखील पोहोचला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.