Master Badminton: कांजी बंधू, डार्विन, किशोर, सुप्रियाची कूच

45+ वयोगटात गोव्याचे खेळाडू दुहेरीत चमकले
अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन (Master Badminton) स्पर्धेच्या 45+ वयोगटात खेळताना गोव्याचा संदीप कांजी (Goa)
अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन (Master Badminton) स्पर्धेच्या 45+ वयोगटात खेळताना गोव्याचा संदीप कांजी (Goa)Dainik Gomantak

पणजी: अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन (Master Badminton) स्पर्धेत गुरुवारी 45+ वयोगटात गोव्याचे (Goa) खेळाडू दुहेरीत चमकले. पुरुष दुहेरीत संदीप व कमलेश हे कांजी बंधू, डार्विन बार्रेटो व किशोर रघुबन्स, तसेच मिश्र दुहेरीत डार्विन व सुप्रिया पै कुचेलकर यांनी आगेकूच राखली.

अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन (Master Badminton) स्पर्धेच्या 45+ वयोगटात खेळताना गोव्याचा संदीप कांजी (Goa)
FC Goa समोर मैदानाचे आव्हान

स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये (Manohar Parrikar Indoor Stadium) सुरू आहे. स्पर्धेतील 35+ ते 50+ वयोगटातील स्पर्धेस गुरुवारपासून सुरवात झाली. या टप्प्यात सातशेहून जास्त खेळाडूंचा सहभाग आहे. गोव्याच्या बॅडमिंटनपटूंनी 55+ ते 75+ वयोगटात लक्षवेधक कामगिरी बजावताना पदके जिंकली. आता दुसऱ्या टप्प्यातही यजमानांना पदकाची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com