स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा संघ गुजरात टायटन्स आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी क्वालिफायर-1 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. आता विजेतेपदाच्या लढतीत त्यांचा सामना राजस्थान आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील क्वालिफायर-2 च्या विजेत्याशी होईल. हार्दिकचा संघ यंदाच्या मोसमात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या गुजरातच्या संघाने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. (Ipl final 2022 Hardik Pandya team Gujarat titans qualifier 1 winner and Ipl final record)
दरम्यान, अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असल्याने अंतिम सामन्यात गुजरातची आघाडी असेल. संघाला तयारीसाठीही पाच दिवस मिळाले आहेत. या सर्व गोष्टींशिवाय आयपीएलचा ट्रेंडही गुजरातच्या बाजूने आहे. स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत क्वालिफायर-1 जिंकणारा संघ केवळ तीन वेळा अंतिम फेरीत पराभूत झाला आहे.
दुसरीकडे, 2011 मध्ये आयपीएलमध्ये (IPL) प्लेऑफ फॉरमॅट सादर करण्यात आला होता. त्यानंतर 2013, 2016 आणि 2017 मध्ये क्वालिफायर-1 जिंकणारा संघ अंतिम फेरीत पराभूत झाला. हे 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings), 2016 मध्ये RCB आणि 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्ससोबत घडले होते. उर्वरित आठ वेळा, निकाल क्वालिफायर 1 जिंकणाऱ्या संघाच्या बाजूने लागला आहे.
या मोसमात गुजरातची कामगिरी
गुजरात संघाबद्दल बोलायचे झाल्यास साखळी फेरीतील 14 पैकी 10 सामने जिंकले. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्याविरुद्ध त्यांचा पराभव झाला होता. या चारपैकी बंगळुरुचा संघ प्लेऑफमध्ये आहे. अशा परिस्थितीत बंगळुरुचा संघ क्वालिफायर-2 जिंकून अंतिम फेरीत पोहोचला, तर दोघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. आयपीएल गुजरातच्या बाजूने जाईल आणि अलीकडील रेकॉर्ड आरसीबीच्या बाजूने जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.