I-League : आय-लीगमध्ये गोलचा पाऊस

I-League : सहा सामन्यांत ३.८३च्या सरासरीने २३ गोल
Marcus Joseph
Marcus Josephkishor petkar
Published on
Updated on

पणजी : आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या फेरीत गोलचा पाऊस पडला. या फेरीतील सहा सामन्यांत ३.८३ च्या सरासरीने २३ गोलची नोंद झाली. सलग चार सामने जिंकून कोलकात्याच्या मोहम्मेडन स्पोर्टिंगने आगेकूच कायम राखली. (A rain of goals in the fourth round of the I-League football tournament)

स्पर्धा सध्या पश्चिम बंगालमध्ये जैवसुरक्षा वातावरणात सुरू आहे. पंजाब एफसी (Panjab FC) व ऐजॉल एफसी (Aizawl FC) यांच्यातील सामना नाट्यमय ठरला. भरपाई वेळेतील दोन गोलमुळे पंजाबने सामना ४-३ फरकाने जिंकला. गतविजेत्या गोकुळम केरळा एफसीने (Gokulam Kerala FC) नवोदित केंकरे एफसीचा ६-२ फरकाने धुव्वा उडविला. त्यात लुका मॅसेन याची हॅटट्रिक लक्षवेधी ठरली.

गोकुळम केरळाने (Kerala) स्पर्धेत धडाका राखताना दोन सामन्यांत ११ गोल केले आहेत. मोहम्मेडन स्पोर्टिंगने इंडियन ॲरोजला (Indian Arrows) ४-० फरकाने हरवून विजयी धडाका कायम राखताला. त्यांचा त्रिनिदाद-टॉबेगोचा मार्कुस जोसेफ चार लढतीत सात गोल नोंदवून सध्या आय-लीगमध्ये (I-League) आघाडीवर आहे. पंजाबचा (Panjab) इंग्लिश खेळाडू कर्टिस गदरी याने सहा गोल केले आहेत.

Marcus Joseph
गोवा : विधानसभेचे विशेष अधिवेशन 15 मार्चला

गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सची स्पर्धेतील स्थिती बिकट आहे. मणिपूरच्या (Manipur) टिड्डिम रोड ॲथलेटिक युनियनने (ट्राऊ) त्यांना दोन गोलच्या फरकाने हरविले. माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सच्या (Churchill Brothers) खाती सध्या फक्त एक गुण आहे.

पुढील लढतीत त्यांच्यासमोर बलाढ्य मोहम्मेडन स्पोर्टिंगचे (Mohammedan Sporting) आव्हान असेल. एकूण १३ संघांच्या या स्पर्धेत गोव्यातील (Goa) संघ अकराव्या क्रमांकावर आहे. चारही सामने हरलेला ऐजॉल एफसी संघ (Aizawl FC team) सध्या शेवटच्या क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com