45th Indian Masters National Badminton championship : बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 633 सामने

इंडियन मास्टर्स 45व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला रविवारपासून सुरवात
Badminton championship
Badminton championshipDainik Gomantak

इंडियन मास्टर्स 45व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला रविवारपासून सुरवात झाली. नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम व फातोर्डा येथील इनडोअर स्टेडियमवर पहिल्या दिवशी पात्रता फेरीतील सामने झाले. त्यासाठी सुमारे 800 खेळाडू बॅडमिंटन कोर्टवर उतरले आणि एकूण 633 सामने झाले.

Badminton championship
I-League 2 : एफसी गोवाचा सलग दुसरा पराभव

स्पर्धा गोवा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने घेण्यात येत आहे. रविवारी 35+, 40+, 45+ व 50+ वयोगटातील पात्रता फेरीचे सामने झाले.

आठ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंच्या 2300 प्रवेशिका दाखल झाल्या असून त्यामध्ये दीडशे गोमंतकीय खेळाडूंचाही सहभाग आहे.

Badminton championship
Margao Muncipality : मडगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे 'तुझं माझं जमेना'

पात्रता फेरीत आगेकूच राखताना अमरीश शिंदे (महाराष्ट्र), अनू गेरा (उत्तर प्रदेश), अर्चना सिंग (महाराष्ट्र), अंजली लोटके (महाराष्ट्र), प्रिया प्रकाश (तेलंगणा), प्रिया आंबेकर (महाराष्ट्र) यांच्यासह कृष्णानंतर वेर्णेकर, अभिषेक गोयल, नीरज गोयल, हरीश च्यारी, कौशिक धोंड, वेन फर्नांडिस, कृष्णप्रसाद नाईक, महेश भंडारी या गोमंतकीय खेळाडूंही आगेकूच राखली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com