Indian Premier League: आयपीएलमध्ये केवळ 'या' 5 भारतीय खेळाडूंनी मिळवली ऑरेंज कॅप, वाचा सविस्तर

Indian Premier League 2023: 31 मार्चपासून आयपीएलचा 16वा सीझन सुरु होत आहे. या मोसमातही ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी सर्व फलंदाजांमध्ये स्पर्धा असणार आहे.
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Indian Premier League 2023: दरवर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व संघांमध्ये स्पर्धा असते, तर दुसरीकडे ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी फलंदाजांमध्येही चढाओढ सुरु असते.

31 मार्चपासून आयपीएलचा 16वा सीझन सुरु होत आहे. या मोसमातही ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी सर्व फलंदाजांमध्ये स्पर्धा असणार आहे. पण आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात केवळ 5 भारतीय फलंदाजांनी ऑरेंज कॅप जिंकली आहे.

दरम्यान, भारताकडून आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा सचिन तेंडुलकर हा पहिला फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आयपीएल 2010 मध्ये हा पराक्रम केला होता. या मोसमात सचिनने 15 सामन्यात 618 धावा केल्या. या मोसमात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 89 होती आणि स्ट्राइक रेटही 130 पेक्षा जास्त होता.

Sachin Tendulkar
IPL 2023: दुखापतग्रस्त जेमिसनच्या जागेवर CSK संघात दाखल झाला 'हा' धाकड वेगवान बॉलर

दुसरीकडे, आयपीएल 2014 मध्ये रॉबिन उथप्पाने सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप जिंकली होती. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना उथप्पाने ऑरेंज कॅप मिळवली होती. उथप्पाने 2014 IPL मध्ये 16 सामन्यात 138 च्या स्ट्राईक रेटने 660 धावा केल्या होत्या.

तसेच, IPL 2016 मध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) ऑरेंज कॅप मिळवली होती. या मोसमात विराट कोहलीने 16 सामन्यात 973 धावा केल्या आहेत.

एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही विराटच्या नावावर आहे. या मोसमात त्याने चार शतकेही झळकावली. केएल राहुलने 2020 च्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकली.

या हंगामात केएल राहुलने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 14 सामने खेळताना 670 धावा केल्या. केएल राहुल आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला.

Sachin Tendulkar
IPL 2023 चा हंगाम सुरु होण्यापूर्वीच RCB ला मोठा झटका, 'हा' स्टार अष्टपैलू खेळाडू...

त्याचबरोबर, चेन्नई सुपर किंग्जचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड यानेही आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकली आहे.

ऋतुराज गायकवाडने मागील हंगामात म्हणजेच, आयपीएल 2021 मध्ये 16 सामन्यांमध्ये 45.35 च्या सरासरीने 635 धावा केल्या आणि त्याला ऑरेंज कॅप मिळाली, ऋतुराजने या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन देखील बनवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com