IPL लिलावात ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या खेळाडूंचा बोलबाला? 'हे' परदेशी ठरू शकतात महागडे

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 लिलावात महागडे ठरू शकणाऱ्या 5 परदेशी खेळाडूंबद्दज जाणून घ्या.
Pat Cummins | Rachin Ravindra | Pat Cummins | IPL 2024 Auction
Pat Cummins | Rachin Ravindra | Pat Cummins | IPL 2024 Auctionx
Published on
Updated on

5 Foreign Players To Watch Out in IPL 2024 Players Auction:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईत रंगणार आहे. या लिलावासाठी 333 खेळाडूंची निवड झाली असून यातील केवळ 77 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे. त्यातही केवळ 30 परदेशी खेळाडूंसाठीच जागा रिक्त आहे.

दरम्यान, यंदाच्या लिलावासाठी अनेक मोठी नावे चर्चेत आहेत, ज्यांना मोठी रक्कम मिळू शकते. त्यातही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंची नावे आघाडीवर आहेत. अशाच पाच परदेशी खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, ज्यांना सर्वाधिक मागणी असू शकते.

1. ट्रेविस हेड

भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ट्रेविस हेड देखील या आयपीएल लिलावात उतरला आहे. त्याची 2 कोटी मुळ किंमत आहे. हेडने गेल्या काही महिन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे.

त्याने नुकतेच भारतात पार पडलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कारही पटकावला होता. त्याने अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावले होते. तसेच त्याच्याकडे फिरकी गोलंदाजी करण्याचीही क्षमता आहे.

तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने त्याला मोठी किंमत मिळू शकते. हेड यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे. त्याने 10 सामने खेळले असून 205 धावा केल्या आहेत आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत.

Pat Cummins | Rachin Ravindra | Pat Cummins | IPL 2024 Auction
IPL 2024: गोव्याचे 'हे' दोन क्रिकेटरही होणार मालामाल? लिलावासाठी निवडलेल्या 333 खेळाडूंमध्ये समावेश

2. मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही तब्बल आठ वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. त्याने 2015 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून अखेरीस आयपीएल खेळले होते.

त्यानंतर 2018 मध्ये तो आयपीएलमध्ये खेळणार होता, मात्र दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही. स्टार्कही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंमध्ये गणला जातो. स्टार्कने आयपीएलमध्ये 27 सामने खेळले असून 34 विकेट्स घेतल्या आहेत.

3. रचिन रविंद्र

यंदा सर्वाधिक लक्ष हे न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्रच्या बोलीकडेही असणार आहे. त्याने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळे त्याला मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. त्याची मुळ किंमत 50 लाख असणार आहे. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 3 शतकांसह 64.22 च्या सरासरीने 578 धावा केल्या होत्या.

4. पॅट कमिन्स

कमिन्स आयपीएलमधील तसा नियमित खेळाडू आहे. पण गेल्यावर्षी वर्कलोड मॅनेजमेंटच्या दृष्टीने त्याने आयपीएलमधून माघार घेतली होती. परंतु, आता तो आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. कमिन्सने नुकतेच ऍशेस, कसोटी चॅम्पियनशीप आणि वर्ल्डकप 2023 स्पर्धा कर्णधार म्हणून जिंकली आहे.

तसेच त्याची घातक वेगवान गोलंदाजी आणि खालच्या फळीत फलंदाजीमध्ये योगदान देण्याची क्षमता त्याला खास बनवते. त्यामुळे या ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठीही फ्रँचायझी मोठ्या रक्कमेची बोली लावताना दिसू शकतात.

कमिन्सने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 42 सामने खेळले असून 45 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 379 धावा केल्या आहेत.

Pat Cummins | Rachin Ravindra | Pat Cummins | IPL 2024 Auction
Hardik Pandya: गुजरात सोडलेल्या हार्दिक पांड्याला लागली लॉटरी, IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचे करणार नेतृत्व

5. डॅरिल मिचेल

न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज डॅरिल मिचेलला देखील मोठी किंमत या लिलावात मिळू शकते. त्याने देखील वर्ल्डकप 2023 स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली होती.

उपांत्य फेरीत भारताविरुद्ध त्याने शतकही ठोकले होते. त्याने या स्पर्धेत 69 च्या सरासरीने 552 धावा केल्या होत्या. दरम्यान, यापूर्वी मिचेलने 2 सामने राजस्थान रॉयल्सकडून खेळले आहेत, ज्यात त्याला 33 धावाच करता आल्या आहेत.

6.वनिंदू हसरंगा

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल 2024 लिलावापूर्वी श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू वनिंदू हसरंगाला मुक्त केले होते. त्यामुळे तो लिलावात उतरला आहे. वनिंदू हसरंगा सध्याच्या अव्वल फिरकीपटूंपैकी एक गणला जातो. तसेच त्याच्याकडे फलंदाजी करण्याचीही क्षमता आहे.

त्यामुळे त्यालाही मोठी किंमत लिलावात मिळू शकते. हसरंगाने आयपीएलमध्ये 26 सामने खेळले असून 35 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 72 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com