Ashes 2023: इंग्लंडला पावसाचा घरचा आहेर, चौथी कसोटी 'अनिर्णित'! ऑस्ट्रेलियाने राखली ऍशेस ट्रॉफी

England vs Australia: मँचेस्टर येथे झालेला चौथा ऍशेस सामना अनिर्णित राहिला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ऍशेस ट्रॉफी आपल्याकडेच राखली.
England vs Australia | Ashes 2023
England vs Australia | Ashes 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Australia retain Ashes: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस 2023 मालिकेतील मँचेस्टरला पार पडलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाचाच अधिक खेळ पाहायला मिळाला.

ऑस्ट्रेलियाने राखली ऍशेस ट्रॉफी

दरम्यान चौथा सामना अनिर्णित राहिल्याने ऑस्ट्रेलिया या मालिकेत सध्या 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. तसेच आता मालिकेतील केवळ अखेरचा कसोटी सामना बाकी असल्याने ऑस्ट्रेलियाने ऍशस पराभव टाळला आहे.

त्याचमुळे ऍशेस ट्रॉफीही आपल्याकडे कायम केली आहे. कारण अखेरच्या कसोटीत काहीही निकाल लागला, तरी ऑस्ट्रेलिया ही मालिका हरणार नाही. तसेच ऑस्ट्रेलियाने यापूर्वीची ऍशेस मालिका जिंकलेली आहे.

England vs Australia | Ashes 2023
Ashes Series 2023: हॅरी ब्रूकचा मोठा धमाका, इंग्लंडसाठी केवळ 18 कसोटी डावांमध्ये रचला इतिहास

पावसाने इंग्लंडच्या आशेवर फेरले पाणी

चौथ्या कसोटीत इंग्लंडला विजयाची चांगली संधी होती, पण पावसामुळे पाचव्या दिवशी खेळच झाला नाही. त्यामुळे सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला. या सामन्यात चौथ्या दिवशीही केवळ 30 षटकांचा खेळ होऊ शकला होता. चौथ्या दिवशी जेव्हा सामना थांबला, तेव्हा ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात 61 धावांनी मागे होते, तसेच ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट्ही गेल्या होत्या.

पण त्यानंतर पावसाचाच खेळ पाहायला मिळाल्याने इंग्लंडच्या मालिकेत बरोबरी करण्याच्या आशेवरही पाणी फिरले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाज 317 धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडने पहिल्या डावात तब्बल 592 धावांचा डोंगर उभारत 275 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 5 बाद 214 धावा केलेल्या असताना पुढे खेळ होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित राहिला.

England vs Australia | Ashes 2023
Ashes 2023: स्टुअर्ट ब्रॉडने गाठला 600 विकेट्सचा टप्पा, मुरलीधरन-वॉर्नच्या खास क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री!

दरम्यान, बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलम या इंग्लंडच्या कर्णधार-प्रशिक्षकाच्या जोडगोळीच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच अनिर्णित सामना आहे.

पाचव्या सामन्यात मालिकेचा निकाल

द ओव्हलवर ऍशेस 2023 मालिकेतील अखेरचा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, किंवा हा सामना अनिर्णित राहिला, तर हा त्यांचा इंग्लंडच्या भूमित 2001 नंतरचा पहिला ऍशेस मालिका विजय असेल. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये अखेरचा कसोटी मालिका विजय 2001 मध्ये मिळवला होता.

त्यानंतर 2005, 2009, 2013 आणि 2015 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्यानंतर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाने ही मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले होते.

दरम्यान, जर अखेरच्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवला, तर 2019 प्रमाणेच ही मालिका बरोबरीत सुटेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com