37th National Games : गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत 37 खेळ निश्चित; आयओए शिष्टमंडळाची माहिती

मूल्यांकनानंतर नवे क्रीडाप्रकार सामावणार
37th National Games in Goa
37th National Games in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

37th National Games : गोव्यात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 37 खेळ निश्चित आहेत, शिवाय नवे खेळ सामावून घेण्यापूर्वी त्यांची तांत्रिक बाबी तपासली जाईल, मूल्यांकन होईल, अशी माहिती स्पर्धा आयोजन तांत्रिक समितीचे अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे उपस्थित होते.

अमिताभ, आयओए खजिनदार सहदेव यादव, सदस्य भूपिंदरसिंग बाजवा यांचे शिष्टमंडळ स्पर्धा तयारी पाहणीसाठी तीन दिवसांच्या गोवा भेटीवर आहे होते. शिष्टमंडळ ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तयारीबाबतचा अहवाल आयओएला सादर करेल.

37th National Games in Goa
चर्चा तर होणारचं! IND vs AUS कसोटी सामन्यादरम्यान सर्वांचे लक्ष PM मोदींकडे, जाणून घ्या

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किती खेळ असतील याबाबत स्पष्टता देताना शर्मा म्हणाले, की "37 खेळ असतील हे निश्चित. त्यात आणखी काही खेळांची भर पडेल. त्यासंबंधी निर्णय घेण्यापूर्वी या खेळांच्या तांत्रिक बाबी व निकषही पाहिले जातील. शिवाय स्थानिक आणि पारंपरिक खेळाना प्रोत्साहन देणे हे आयओएचे धोरण आहे. नवे खेळ सामावून घेताना मूल्यांकन केले जाईल."

37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तयारी पाहणी करताना नवे खेळ पेंचाक सिलाट, स्क्वे मार्शल आर्ट, रोल बॉल, परंपरागत लगोरी या खेळांची प्रात्यक्षिके शिष्टमंडळाने सोमवारी पाहिली व या खेळांची माहिती करून घेतली. उत्तर भारतात लोकप्रिय असलेला गतका हा खेळ, तसेच अन्य काही खेळही राष्ट्रीय स्पर्धेतील नव्या खेळांच्या रांगेत असल्याची माहिती अमिताभ शर्मा यांनी दिली. स्पर्धेत समावेश होणाऱ्या नव्या खेळांची लवकरच घोषणा होईल, असे त्यांनी नमूद केले.

चिंता नाहीत, पण सूचना...

अमिताभ शर्मा म्हणाले की, " स्पर्धेच्या साधनसुविधा तयारी व उपलब्धतेबाबत आम्हाला अजिबात चिंता नाही, आम्ही समाधानी आहोत. मात्र काही सूचना अवश्य आहेत. त्यानुसार संबंधित अभियंता, अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. काही स्पर्धा केंद्रांबाबतही आम्ही बदल सुचविले आहेत, तेथे तांत्रिक बाबींचा अभाव जाणवतो. उदाहर्णार्थ फोंडा क्रीडा संकुलात वेटलिफ्टिंग स्पर्धा घेणे शक्य नाही, त्यामुळे आम्ही पर्यायी केंद्राची सूचना केली आहे."

व्हेलोड्रोमअभावी सायकलिंग राज्याबाहेर

गोव्यात सायकलिंगसाठी व्हेलोड्रोम नाही, त्यामुळे संबंधित क्रीडा प्रकार गोव्याबाहेर जवळील शहरात घेण्याबाबत चर्चा सुरू आहे, मात्र सायकलिंग रोड रेस स्पर्धा गोव्यातच होणार असल्याची माहिती अमिताभ यांनी दिली.

नेमबाजी क्रीडाप्रकारही गोव्याबाहेर घेणार असल्याचे ते म्हणाले. गुजरातमधील 36व्या क्रीडा स्पर्धेत सेलिंग क्रीडा प्रकार नव्हता, मात्र गोव्यातील स्पर्धेत दोना पावला समुद्रात त्याचे आयोजन होईल. यासंबंधी गोवा यॉटिंग असोसिएशनच्या संपर्कात असल्याचे त्यांनी नमूद केले. एखादा खेळ स्पर्धेतून रद्द करण्याची शक्यता अमिताभ यांनी फेटाळली.

"राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी गोवा पूर्णपणे सज्ज होत आहे. येथे साधनसुविधांची कमतरता भासणार नाही याची पूर्ण खात्री आहे. स्वप्नपूर्ती दूर नाही. ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्याच्या दृष्टीपथास आहे आणि स्पर्धा येथेच होईल."

- अमिताभ शर्मा, आयओए स्पर्धा आयोजन तांत्रिक समितीचे अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com