Cricket Story: झाडावर बॉल अडकला अन् फलंदाजांनी काढल्या 286 धावा? वाचा नक्की झालेलं

क्रिकेटमध्ये एक अशी कथा सांगितली जाते की एका चेंडूवर तब्बल 286 धावा निघाल्या होत्या.
Cricket Stories
Cricket Stories

286 runs scored off one ball:

क्रिकेट या खेळाला मोठा इतिहास आहे. जवळपास 150 वर्षांहून अधिक काळापासून हा खेळ खेळला जात आहे. त्यामुळे क्रिकेटच्या अनेक कथा प्रचलित आहे. अनेक जुन्या सामन्यांच्या-खेळाडूंच्या कथा आजही सांगितल्या जातात, ज्यात काहीतरी पराक्रम झाला आहे. अशी एक कथा आहे, ज्यात सांगितले होते की चेंडू झाडात अडकल्याने चक्क 286 धावा निघाल्या होत्या.

लंडनमधील इंग्लिश वृत्तपत्र पॉल मॉल गॅझेटने याबद्दल पहिल्यांदा वृत्त दिले होते. 15 जानेवारी 1894 तारखेच्या या वृत्तपत्राच्या 'स्पोर्टिंग नोट्स आणि न्यूज' या विभागात या सामन्याची माहिती होती, ज्यात या सामन्याचा उल्लेख होता.

Cricket Stories
भारत-न्यूझीलंड सामना ठरला ब्लॉकबस्टर! IND vs PAK लाही मागे टाकत रचला Viewership चा नवा इतिहास

या वृत्तानुसार हा सामना वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील बनबरीमध्ये व्हिक्टोरिया विरुद्ध स्क्रॅच इलेव्हन संघात झाला होता. या सामन्यात व्हिक्टोरिया संघातील दोन फलंदाज सलामीला फलंदाजीला आले, पण पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने इतका जोरात चेंडू मारला की मैदानात असलेल्या मोठ्या आणि उंच झाल्याच्या फांद्यांमध्ये चेंडू अडकला.

त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाने चेंडू हरवल्याचे अपील केले. पण पंचांनी तो चेंडू त्यांना दिसत असल्याने हे अपील फेटाळले. त्यावेळी तो चेंडू खाली पाडण्याचे खूप प्रयत्न केले. पण चेंडू खाली पडत नव्हता.

त्यावेळी एकाने चेंडू खाली पाडण्यासाठी रायफलच आणली. त्या रायफलने अनेक शॉट मारले. अखेर एक शॉट अचूक लागला आणि चेंडू खाली पडला. पण चेंडू जमीनीला टेकण्यापूर्वी कोणीही तो झेलू शकले नाही, त्यामुळे फलंदाजाला बादही करता आले नाही.

Cricket Stories
World Cup 2023: पाकिस्तान की न्यूझीलंड, भारताविरुद्ध कोण खेळणार सेमीफायनल? कोलकातामध्ये होणार निर्णय

विशेष म्हणजे चेंडू खाली पडेपर्यंतच्या वेळेत व्हिक्टोरियाच्या दोन फलंदाजांनी धावून 286 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर व्हिक्टोरियाने डाव घोषित केला आणि नंतर हा सामनाही जिंकला. दरम्यान, 286 धावा फलंदाज धावले म्हणजे ते चेंडू झाडातून खाली पडे पर्यंत जवळपास 6 किलोमीटर धावले.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या सामन्याबद्दल खात्रीशीर असा कोणताही पुरावा नाही. पॉल मॉल गॅझेटचे वृत्त हा एकमेव पुरावा आहे. तसेच ऑस्ट्रेलियन मीडियानुसार ही एक फक्त एक प्रचलित कथा आहे. वेस्टर्न मेल या वृत्तपत्राने ही फक्त एक काल्पनिक कथा असल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com