Kabaddi Player Died: धक्कादायक! कबड्डी खेळतानाच 20 वर्षीय खेळाडूचा अचानक मृत्यू, Video Viral

कबड्डीचा सामना खेळत असताना 20 वर्षीय युवकाचा अचानक मैदानावर कोसळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
20 year old player died during Kabaddi Match
20 year old player died during Kabaddi MatchDainik Gomantak

Shocking Kabbadi News: मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मलाडमध्ये झालेल्या एका कबड्डी स्पर्धेत खेळताना 20 वर्षीय युवकाला जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

गुरुवारी मुंबईतील मलाड येथे एक कबड्डी स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेतील सामना खेळताना कार्तिकराज मल्लन हा 20 वर्षीय महाविद्यालयीन खेळाडू अचानक खाली कोसळला, त्यानंतर तो उठलाच नाही.

20 year old player died during Kabaddi Match
Goa: गोव्याची पोरं लय भारी! कबड्डी संघाने गाठली सलग दुसऱ्या वर्षी बाद फेरी

रिपोर्ट्सनुसार त्याला तात्काळ शताब्दी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. मात्र हॉस्पिटलमध्ये आणण्याआधीच त्याने जीव गमावल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण त्याच्या मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार त्याला हृदयविराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे.

समोर आलेल्या व्हिडिओतून असे दिसून येत आहे की सामना सुरू असताना कार्तिक राजने चढाई केली. त्याने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनी त्याची यशस्वी पकड केली. मात्र पकड झाल्यानंतर तो परत जात असताना अचानक कोसळला.

त्यानंतर सामना खेळत असलेल्या अन्य खेळाडूंनी लगेचच त्याच्याकडे धाव घेतली. या घटनेबद्दल लगेचच मलाड पोलिसांना कळवण्यात आले होते. दरम्यान आता या प्रकरणाची चौकशी मलाड पोलिस करत आहेत.

20 year old player died during Kabaddi Match
तेलंगाना: कबड्डी टूर्नामेंट दरम्यान गॅलरी कोसळल्याने मोठा अपघात; मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल

तसेच सध्या समोर आलेल्या माहितीनुसार कार्तिक राज मुंबईतील संतोष नगरमधील रहिवासी आहे. तसेच तो गोरेगावमधील विवेक कॉलेजमध्ये बी.कॉमचे शिक्षण घेत होता.

दरम्यान, यापूर्वीही अनेकदा खेळाडूंनी मैदानात अचानक कोसळल्याने जीव गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com