Asian Games: ज्योती सुरेखा-ओजसची 'गोल्डन' हॅट्रिक, तर भारताने केले पदकांचे शतक; पाहा 14 व्या दिवशीचे निकाल

India at Asian Games: भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील १४ वा दिवस सुवर्णमय ठरला आहे.
Jyothi Surekha Vennam and Ojas Pravin
Jyothi Surekha Vennam and Ojas PravinDainik Gomantak
Published on
Updated on

19th Asian Games Hangzhou, 14th Day, 7th October, India Result:

चीनमध्ये सुरु असेलल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवसापासून भारतीय खेळाडूंची सातत्याने शानदार कामगिरी सुरू आहे. आता या स्पर्धेच्या 14 व्या दिवशी म्हणजेच शनिवारी (7 ऑक्टोबर) भारताच्या खात्यात विक्रमी 100 हून अधिक पदकांची नोंदही झाली आहे.

भारताला सुरुवातीला तिरंदाजीत मोठे यश मिळाले. महिलांच्या कम्पाउंड एकेरी प्रकारात भारताच्या आदिती स्वामी गोपीचंदने कांस्य पदक पटकावले. तिने तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या रतीह झिलिझाती फाधली हिली 146-140 अशा फरकाने पराभूत करत कांस्य पदक जिंकले.

याच क्रीडा प्रकारात ज्योती सुरेखा वेन्नमने इतिहास रचला. तिने सुवर्ण पदकासाठी झालेल्या सामन्यात कोरियाच्या चायवॉन सो हिला 149-145 अशा फरकाने पराभूत केले आणि सुवर्ण पदकारवर नाव कोरले.

ज्योती सुरेखाचे हे या स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्ण पदक ठरले आहे. यापूर्वी तिने तिरंदाजीत कंपाउंड प्रकारात मिश्र दुहेरीमध्ये ओजस देवतळेसह सुवर्ण पदक जिंकले आहे, तसेच भारतीय महिला संघासह देखील सांघिक गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

Jyothi Surekha Vennam and Ojas Pravin
Asian Games: भारतीय हॉकी संघाला सुवर्ण यश! जपानला पराभूत करत चौथ्यांदा जिंकलं 'गोल्ड मेडल'

दरम्यान पुरुषांच्या कम्पाउंड एकेरी प्रकारातही भारताचेच वर्चस्व दिसले. अंतिम सामना भारताच्याच ओजस देवतळे आणि अभिषेक वर्मा या दोन खेळाडूंमध्ये झाला. या सामन्यात ओजसने 149-147 अशा फरकाने अभिषेकला पराभूत करत सुवर्ण हॅट्रिक साधली, तर अभिषेकला पराभवामुळे रौप्य पदक मिळाले.

यापूर्वी ओजस आणि अभिषेक यांनी कम्पाउंड सांघिक प्रकारात भारतीय संघाकडून सुवर्ण पदक जिंकले आहे.तसेच ओजसने ज्योती सुरेखासह मिश्र दुहेरीत सुवर्ण जिंकले आहे.

शनिवारी तिरंदाजीतील यशानंतर भारताच्या महिला कबड्डी संघानेही सुवर्ण यश मिळवले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चायनीत तिपैईविरुद्ध 26-25 असा रोमांचक विजय मिळवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारतीय महिला कबड्डी संघाचे हे एशियाडमधील तिसरे सुवर्णपदक ठरले. त्यांनी 2010 आणि 2014 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

दरम्यान, महिला कबड्डी संघाने मिळवलेले सुवर्ण पदक हे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे 100 वे पदक ठरले. त्यामुळे भारताने या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पदकांची शंभरी गाठण्याचा विक्रम केला.

Jyothi Surekha Vennam and Ojas Pravin
Asian Games: भारताच्या महिला कबड्डी संघाची गोल्डन 'रेड', अंतिम सामन्यात चायनीज तैपेईला लोळवले

महिलांनंतर भारताच्या पुरुष कबड्डी संघानेही सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अखेरच्या क्षणी वाद झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इराणला  33-29 अशा फरकाने पराभूत करत सुवर्णपदक जिंकलं.

त्याचबरोबर बुद्धीबळात भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी प्रत्येकी रौप्य पदक जिंकले. कुस्तीमध्ये दीपक पुनियानेही 86 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले.

क्रिकेटमध्येही पदक

शनिवारी भारताच्या पुरुष क्रिकेट संघानेही सुवर्ण पदक जिंकले. शनिवारी पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झाला. पण हा सामना सुरु असताना पावसाचा अडथळा आल्याने रद्द झाला.

मात्र, या स्पर्धेत भारताचे मानांकन अफगाणिस्तानपेक्षा अधिक असल्याने भारताला सुवर्णपदक मिळाले, तर अफगाणिस्तानला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

हॉकी संघालाही पदक

भारताच्या महिला हॉकी संघाने शनिवारी कांस्य पदक जिंकले. शनिवारी महिलांच्या हॉकी स्पर्धेत कांस्य पदकासाठी भारत आणि जपान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाने 2-1 अशा फरकाने जपानला पराभूत करत कांस्य पदक जिंकले.

भारताचे पदके

दरम्यान, शनिवारी भारताची या स्पर्धेतील मोहिम संपली. भारताने या स्पर्धेत विक्रमी 107 पदके जिंकली. यामध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com