1983 World Cup: 39 वर्षांपूर्वी वर्ल्ड क्रिकेटवर भारताने फडकवला होता तिरंगा!

अनेक कर्णधारांसह खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला उंचीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 Kapil Dev
Kapil DevDainik Gomantak

1983 World Cup: अनेक कर्णधारांसह खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला उंचीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सुवर्ण प्रवासात टीम इंडियाने अनेक चढउतारही पाहिले. खेळाडूंवर झालेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी एके काळी भारतीय क्रिकेटमध्ये वादळ आलं होतं. (1983 world cup 39 years ago on this day the story of india ruling the world cricket began kapil dev sunil gavaskar)

तर दुसरीकडे, परदेशी भूमीवर तिरंगा फडकवण्याचे कामही याच युवा संघाने केले. पण हा प्रवास कधी सुरु झाला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. 39 वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी, जेव्हा टीम इंडियाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला, तेव्हापासूनच जागतिक क्रिकेटवर भारताच्या सुवर्ण प्रवासाची कहाणी सुरु झाली. भारताने अंतिम फेरीत दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिजचा पराभव करुन इतिहास रचला.

 Kapil Dev
हार्दिक पंड्या T-20 World Cup साठी सज्ज

दरम्यान, 1983 चा विश्वचषक खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये (England) पोहोचली तेव्हा चाहत्यांना सोडा, अनेक खेळाडूंना विजयाची अपेक्षाही नव्हती. आता या ऐतिहासिक विश्वचषकावरही चित्रपट आला आहे, ज्यामध्ये बोर्डाचाही आपल्या खेळाडूंवर विश्वास नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. याआधी झालेल्या दोन विश्वचषकांमध्ये टीम इंडियाने फक्त एकच सामना जिंकला होता. त्याच वेळी, विश्वचषक सुरु होण्यापूर्वी, संघ देखील बदलाच्या काळातून जात असताना, कर्णधारपदाची जबाबदारी सुनील गावस्कर यांच्याऐवजी कपिल देव यांच्याकडे सोपवण्यात आली. विश्वचषकादरम्यान कपिल देव हे एकमेव खेळाडू होते, ज्यांनी विजेतेपदाचे स्वप्न पाहिले होते.

 Kapil Dev
Women's World Cup: सेमी फायनलसाठी भारतासह तीन संघात 'कांटे की टक्कर'

विश्वचषकात भारताने दमदार सुरुवात केली

भारताने 1983 च्या विश्वचषकाची सुरुवात दोन वेळा चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजचा 34 धावांनी पराभव करुन धडाकेबाज पद्धतीने केली होती. या सामन्यात टीम इंडियाचा हिरो ठरला यशपाल शर्मा, ज्याने 89 धावांची खेळी खेळून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेच्या दुसऱ्या मॅचमध्ये 5 विकेट्स घेत सर्वांना चकित केले. अंडरडॉग म्हणून विश्वचषकात पोहोचलेल्या या संघाने अशी दमदार कामगिरी करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

 Kapil Dev
ICC Women's World Cup: भारताचं भविष्य आता पाकिस्तानच्या हातात, जाणून घ्या

अतिआत्मविश्वासामध्ये भारत

पहिल्या दोन सामन्यांच्या विजयानंतर भारतीय खेळाडूंमध्ये अतिआत्मविश्वास निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात भारताचा 162 धावांनी पराभव केला, तर विंडीजने चौथा सामना 66 धावांनी जिंकून पराभवाचा बदला घेतला. आता टीम इंडियाला (Team India) बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुढील दोन सामने जिंकावे लागणार होते. ज्यामध्ये कर्णधार कपिल देव यांनी आघाडीचे नेतृत्व केले.

 Kapil Dev
U19 World CUP: अफगाणिस्तानच्या 'या' खेळाडूंनी मायदेशी परतण्यास दिला नकार

कपिल देवने ऐतिहासिक खेळी केली

झिम्बाब्वेविरुद्धच्या पुढील सामन्यात भारताची (India) सुरुवात निराशाजनक झाली. टीम इंडियाने अवघ्या 9 धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर फलंदाजीला आलेले कर्णधार कपिल देव यांनी 175 धावांची ऐतिहासिक खेळी करत सामन्याचे रुप पालटवले. त्यावेळी एका डावात एका फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा होत्या. भारताने हा सामना 31 धावांनी जिंकला, त्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 118 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com