Youtube
Youtube Dainik Gomantak

YouTube वापरताना 'ही' एकच चूक पडू शकते महाग, अशी घ्या काळजी

अनेक लोक मनोरंजनासाठी युट्यूबचा वापर करतात.
Published on

YouTube: अनेक लोक मनोरंजनासाठी युट्यूबचा वापर करतात. अनेक प्रकारचा कंटेट तुम्हाला येथे मिळतो. पण येथे येणाऱ्या जाहिराती अनेकदा मनोरंजनाच्यामध्ये अडथला निर्माण करतात.या जाहिराती पुर्वी काही सेंकदांच्या होत्या. पण नंतर त्या स्किप करण्याचाही पर्याय आला. पण आता कोणताही व्हिडिओ पाहण्यापुर्वी सर्व जाहिराती पाहाव्या लागतात. अनेकदा तर या जाहिरातींच्या संख्या ४ ते ५ पर्यंत असते.

युट्यूबवर कोणताही व्हिडिओ पाहण्यापुर्वी जाहिराती पाहाव्या लागतात. याच जाहिरातींना थाबंवण्यासाठी काहीजण Ad Blockers चा वापर करत आहेत. पण अशा युजर्सला रोखण्यासाठी युट्यूबने मोठा निर्णय घेतला आहे.

  • काय आहे नेमकं प्रकरण

Android Authority च्या रिपोर्टनुसार युट्यूब एका नव्या थ्री-स्ट्राइक पॉलिसीवर काम करत आहे. या योजनेअंतर्गत कंपनी अशा युजर्ससाठी युट्यूब व्हिडिओ ब्लॉक करमार आहे. जे सलग तीन व्हिडिओ Ads Blocker चा वापर करत राहतील.

Youtube
Medicine QR Code: आता क्यूआर कोड सांगणार औषधं खरी की खोटी; केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

जर एखाद्या युजरने Ads Blocker चा वापर करत तीन व्हिडिओ पाहिले तर युट्यूब त्यांना ब्लॉक करेल. पण कंपनीने युजर्स नेमक कधीपर्यंत व्हिडिओ पाहू शकणार नाहीत.

दरम्यान, जर ब्लॉक व्हायचे नसेल तर Ads Blocker काढून टाका असे आवाहन कंपनीने केले आहे.

  • प्रिमियम प्लानसाठी किती पैसे भरावे

जर तुम्हाला व्हिडिओ पाहतांना जाहिरात पाहायची नसेल तर कंपनी YouTube Premium चे सबस्क्रीप्शन घेण्याचे आवाहन करत आहे. भारतामध्ये YouTube Premium Subscription घ्यायचे असेल तर महिन्याला १२९ रूपये भरावे लागतील. त्यामुळे तुम्ही जर Ad Blocker वापरत असाल तर आताच सावध व्हा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com