Medicine QR Code: आता क्यूआर कोड सांगणार औषधं खरी की खोटी; केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

Medicine QR Code: सरकारने या कंपन्यांना त्यांच्या औषधांवर बार कोड लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
QR Code| medicine
QR Code| medicine Dainik Gomantak
Published on
Updated on

Medicine QR Code: औषध खरी की खोटी याचं टेन्शन नेहमीच असतं. तुम्ही मेडिकल स्टोअरमधून खरेदी करत असलेले औषध खरे आहे की नाही, आता त्याबाबत टेन्शन घेण्याची गरज नाही. 1 ऑगस्टपासून तुम्ही QR कोड स्कॅन करून औषधे खरी आहेत की नाही हे स्वतःच जाणून घेऊ शकता. केंद्र सरकारने आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून 300 औषधांवर क्यूआर कोड लावण्याचे आदेश दिले आहेत.

औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 मध्ये सुधारणा करून, सरकारने फार्मा कंपन्यांना त्यांच्या ब्रँडवर H2/QR लावणे अनिवार्य केले आहे. भारताच्या ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने फार्मा कंपन्यांना त्यांच्या औषधांवर बार कोड टाकण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

बनावट औषधांवर कारवाई करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 2022 मध्येच केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करून फार्मा कंपन्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी आज 1ऑगस्टपासून करण्यात आली आहे.

हा बार कोड किंवा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्हाला औषधाबद्दल सर्व काही कळू शकेल. आजपासून तुम्हाला अल्लेग्रा, शेलकल, कॅल्पोल, डोलो आणि मेफ्टल या औषधांवर QR कोड मिळतील. सरकारने या कंपन्यांना त्यांच्या औषधांवर बार कोड लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

सरकारच्या सूचनांचे पालन न केल्यास फार्मा कंपन्यांना दंड होऊ शकतो. औषधाचे योग्य आणि जेनेरिक नाव, ब्रँड नाव, उत्पादकाचे तपशील, उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट , परवाना क्रमांक अशी सर्व माहीती औषधांवरील या QR कोडद्वारे, लोकांना औषधाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती मिळेल.

QR Code| medicine
LPG Price: सिलिंडरच्या किमती घटल्या पण किती रुपयांनी? जाणून घ्या नव्या किंमती

बनावट औषधांवर कारवाई करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बनावट औषधांबाबत सरकारची भूमिका अत्यंत कठोर असल्याचे म्हटले आहे.

बनावट औषधांबाबत सरकार 'झिरो टॉलरन्स' धोरण अवलंबत असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात- सरकारने 18 फार्मा कंपन्यांचा परवाना रद्द केला आणि 71 कंपन्यांना भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होण्याच्या प्रकारांमध्ये घट होईल असे म्हटले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com