Success Tips: यशाची सुरुवात विश्वासाने होते; स्वत:वरच शंका असल्यास धारणा बदलाव्या लागतील

Work Belief And Motivation: आपण करत असलेल्या कामावर आणि त्याच्या यशावर विश्वास असणे खूप महत्वाचे आहे.
Work Belief And Motivation
Success MantraDainik Gomantak
Published on
Updated on

आपण काहीतरी नवीन करतो तेव्हा त्याचे संभाव्य परिणाम आपल्या मनात आधीच तयार होतात, असा मानसशास्त्रज्ञांचा विश्वास आहे. हे एका छोट्या उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही जेवणाच्या टेबलावर जेवत आहात, तुम्हाला तुमच्या जेवणात मीठ कमी वाटत आहे, पण टेबलावर मीठ नाही, तुमची पत्नी तुम्हाला सांगते की किचनमध्ये कपाटात मीठ ठेवले आहे, जा आणि घेऊन या. मीठ तुम्हाला सापडणार नाही म्हणत, तुम्ही लगेच जाणार नाही असे सांगता.

तुमची बायको पुन्हा एकदा तुम्हाला जाण्यासाठी सांगते पण, तुम्ही जागेवरुन उठण्याच्या मूडमध्ये नाहीत. मीठ सापडणार नाही अशी सबब सांगत तुम्ही जाण्याचे टाळत असता. पण, पत्नीच्या विनंतीवरून तुम्ही अनिच्छेने का होईना उठता आणि किचनमध्ये जाता, पण कपाटासह स्वयंपाकघरात अनेक ठिकाणी शोधूनही तुम्हाला मीठ काही सापडत नाही.

अखेर पत्नीला किचनमध्ये यावे लागते आणि तिला समोर ठेवलेल्या कपाटात लगेच मीठ सापडते. असं का झालं? खूप शोध घेऊनही तुम्हाला मीठ सापडलं का नाही? त्याचवेळी तुमच्या पत्नीला लगेच मीठ कसं सापडलं?

Work Belief And Motivation
Mumbai To Goa Ro Ro Ferry: मुंबई ते गोवा फक्त 6 तासांत! समुद्रातून धावणार रो - रो फेरी; लवकरच सुरु होणार सेवा

याचा अर्थ असा आहे की तुम्ही जो विचार करता, तुमचे मन ज्या प्रकारे ते समजून घेते त्याचा तुमच्या कामावर विशेष प्रभाव पडतो. तुमच्या आंतरिक आकलनामुळे तुमचे मन त्या कार्याशी संबंधित एक काल्पनिक वातावरण तयार करते, जे तुमच्या यश किंवा अपयशाला जबाबदार असते.

Work Belief And Motivation
Goa Tourism: भाजप आमदाराने गोवा सरकारची केली कान उघडणी, 'पर्यटन घटतंय', वेळीच जागे होण्याचा दिला सल्ला

आपण करत असलेल्या कामावर आणि त्याच्या यशावर विश्वास असणे खूप महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, किचनमधून मीठ आणण्याबाबत, तुम्हाला ते सापडणार नाही अशी धारणा तुम्ही आधीच केली होती, त्यामुळे तुमच्या मनाने या गृहीतकावर चिटकून राहिले आणि तुम्हाला स्वयंपाकघरात मीठ सापडले नाही. यशाच्या बाबतीत देखील हाच सिद्धांत लागू होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com