Camphor benefits: कापरचे 'हे' आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क!

कापराचा वापर केवळ देवापुढे दिवालावण्यासाठीच नाही तर अनेक आरोग्यदायी कारणांसाठीही केला जातो.
Camphor benefits
Camphor benefitsDainik Gomantak
Published on
Updated on

पूजेच्या ताटात तुम्ही कापराचा वापर अनेकदा केला असेलच. पण कापराचा वापर केवळ देवापुढे दिवालावण्यासाठीच नाही तर अनेक आरोग्यदायी कारणांसाठीही केला जातो हे अनेकांना माहीत नसतं. कापराच्या मदतीने अनेक प्रकारचे आजार बरे केले जाऊ शकतात. याचा वापर औषध म्हणून केला जातो आणि याचं तेलही खूप फायदेशीर मानलं जातं. अनेक औषधांमध्येही कापूर घातलेलं असतं. चला जाणून घेऊ कापराचे आरोग्यदायी फायदे-

सगळ्यांच्या घरात कापूर असतोच. आपल्याकडे कापराच्या वापराला धार्मिक कार्यांशी जोडलेले आहे, त्यामुळे हमखास कापूर आपल्या घरात असतोच, पण कापराला इतके महत्त्व देण्यामागचे कारण वाचाल तर थक्क व्हाल. कापूर, एक मानवनिर्मित सुवासिक वस्तू नसून, नैसर्गिक वनस्पती आहे. कापराची निर्मिती त्याच्या झाडांपासून होते, पण झाडांपासून मिळणाऱ्या शुद्ध कापराच्या फायद्यांपासून आपण अनभिज्ञ आहोत. या फायद्यांना वैज्ञानिक आधार पण आहे.आज आपण घराघरात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या भीमसेनी कापराचे फायदे बघणार आहोत-

1) वेदना कमी करणे – कापूर हा वेदना नाशक असतो. त्यामुळे सुजल्यावर, मुका मार लागल्यावर किंवा कोणत्याही बाह्य दुखण्यावर कापराचे तेल लावून मालिश केल्यामुळे वेदना व सूज पटकन कमी होते.

2) खाज- खरूज घालवणे – सतत खाज येत असलेल्या अवयवावर किंवा रॅश येऊन लाल झालेल्या ठिकाणी कापराचे तेल लावल्यावर हे रॅश पटकन कमी होतात व खाज थंबते. त्वचेवरील लालसरपणा देखील त्वरित नाहीसा होतो.

3) नखांचे आजार घालवणे – कधी कधी Trichophyton mentagrophytes आणि Candida parapsilosis या फंगसच्या प्रजातींशी संपर्कात आल्यावर आपल्याला “ओनिकोमायकॉसिस” या रोगाचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे, आपल्या नखांना बुरशी येते, खाज येते, जखम होते. कापराचे तेल नखांवर लावल्याने हा आजार जाऊ शकतो.

Camphor benefits
Winter Diet Plan: वर्षभर तब्येत ठणठणीत हवी असेल, तर थंडीत खा 'या' गोष्टी

4) एक्झिमावर जालीम उपाय – एक्झिमा हा लहान मुलांना व म्हाताऱ्या माणसांना होणार त्वचा विकार आहे. यात त्वचेवर लाल किंवा काळे डाग पडतात आणि त्यामुळे भरपूर वेदना जाणवते. त्यामुळे कापराचे तेल असलेले क्रीम किंवा लोशन लावल्यास या रोगापासून त्वरित मुक्ती मिळू शकते. नुसते कापराचे तेल साध्या खोबऱ्याच्या तेलात मिसळून लावले तरीही फरक जाणवतो.

5) निद्रानाश घालवणे – ज्यांना निद्रानाश हा त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. कापराचे तेल वापरल्याने खोलीत जो मंद सुवास दरवळतो, त्या सुवासाने झोप येण्यास मदत होते. उशीवर कापराची एक वडी सुद्धा घासू शकता, उशीला येणाऱ्या सुवासाने आपल्याला झोप येईल.

6) सर्दी पडस्यावर उपायकारक – सर्दी होऊन नाक बंद झाल्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर कापूर रुमालात घेऊन थोड्या थोड्या वेळाने तो हुंगा.

Camphor benefits
Homemade Hair Oils: केसांच्या वाढीसाठी करा 'हे' घरगुती उपाय

7) केसांची वाढ होणे – आपल्या केसांची वाढ भरपूर कारणांमुळे खुंटते जसे – सुरळीत रक्ताभिसरण नसल्याने, केसांची स्वच्छता न राखल्याने किंवा कोंडाअसल्याने, पण या सगळ्या समस्यांवर एक उपाय आहे तो म्हणजे कापूर. रात्री झोपताना कापराच्या तेलाने मालिश केल्यास रक्ताभिसरण सुरळीत होते व बाकी सगळ्या समस्या संपून केसांची वाढ व्यवस्थित होते. कापराच्या तेलाने केस मऊ होतात व चमकतात सुद्धा.

8) रक्ताभिसरण सुरळीत होणे – काहीही व्याधी नसली, तरी महिन्यातून एकदा कापराच्या तेलाने पूर्ण शरीराची मालिश करावी. याने आपल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन रक्ताभिसरण सुरळीत होते. ज्यामुळे हृदयविकार, लकवा, हाताला मुंग्या येणे या आजारांपासून आपण कायम दूर राहू शकतो.

(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील माहितीमधील औषधे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com