Constipation पासून मिळेल सुटका; रोज करा 'ही' आसने

Yoga Mantra: तुम्हालाही जर गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर हे यागासने नक्की करुन पाहा.
Constipation | Yoga mantra
Constipation | Yoga mantraDainik Gomantak
Published on
Updated on

अनेक लेकांना पोटाच्या अनेक समस्या असतात. यामध्ये गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य आहे. अनेक लोक अन्न टाळून या समस्या टाळण्याचा प्रयत्न करतात. पण काहींना यापासून आराम मिळण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. तसे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही योगासनांची मदत घेऊ शकता. ही सर्व आसने बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन, अपचन आणि गॅस यांसारख्या समस्यांपासून मुक्ती देण्यास मदत करतात.

  • बद्धकोष्ठतेवर उपयुक्त आसने

  • पश्चिमोत्तानासन

हे संस्कृत मूळ शब्दांपासून बनलेले आहे. ज्यामध्ये पश्चिम-मागे किंवा दिशा, उत्ताना म्हणजे तीव्र ताणणे, आसन- बसण्याची पद्धत. हा योगा केल्याने मन शांत होते आणि तणावही दूर होतो. याशिवाय पचन होण्यास मदत मिळते.

Paschimottanasana
PaschimottanasanaDainik Gomantak
  • वज्रासन

वज्रासन करायला खूप सोपे आहे. लोक अनेकदा अन्न खाल्ल्यानंतर हा योग करतात. असे केल्याने तुमची पचनसंस्था निरोगी राहते. ज्यामुळे पोषक तत्व शरीरात सहज शोषले जातात. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.

Vajrasana
VajrasanaDainik Gomantak
  • पवनमुक्तासन

हे आसन केल्याने पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. पवनमुक्तासन अतिशय सक्रिय चयापचय शांत करण्याचे कार्य करते. याशिवाय हे आसन शरीरातील पोषकद्रव्ये शोषून घेण्यास मदत करते.

Pavanamuktasana
PavanamuktasanaDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com