World Pulses Day: पौष्टिकतेने संपूर्ण असलेल्या 'या' डाळी खाल्ल्याने राहाल निरोगी

निरोगी आरोग्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. आहारात डाळींचा समावेश करणे फायदेशीर असते.
World Pulses Day 2024
World Pulses Day 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

world pulses day 2024 these pulses good for healthy life

चुकीची लाइफस्टाइल आणि खराब खाण्याच्या सवयींमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. निरोगी आरोग्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा आहाराचा समावेश करणे गरजेचे आहे.

जर तुम्ही प्रथिने आणि पौष्टिक आहाराचे नियमित सेवन केले तर तुमचे आरोग्य नेहमीच निरोगी राहील. कडधान्यांचा आहारात समावेश असलाच पाहिजे. यामध्ये प्रथिन, फायबर मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी होणे, मधुमेह, पचनसंस्थेच्या समस्या दूर होतात.

उडीद डाळ

काळी डाळ किंवा उडीद डाळ आरोग्यदायी असते. या डाळीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळित कार्य करते. याशिवाय या डाळीमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी 3 भरपुर प्रमाणात असते. जे तुमची ऊर्जा पातळी, हृदयाचे आरोग्य आणि मज्जासंस्था सुधारण्यासाठी काम करते.

मूग डाळ

मूग डाळ खाल्ल्याने पचनसंस्था सुरळित कार्य करते. ती खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा देखील चांगली राहते. यासोबतच पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहाने परिपूर्ण असलेल्या या उच्च प्रथिनयुक्त डाळीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

मसूर डाळ

मसूर डाळ वजन कमी करण्यास मदत करते. एक वाटी मसूर डाळमध्ये अनेक पोषक घटक असात. जे तुमच्या आरोग्याला निरोगी ठेवते.

हरभरा डाळ

या डाळीमध्ये प्रथिने आणि फायबर भरपुर असतात. चवीबरोबर ही डाळ आरोग्यासाठी देखील असते. एक वाटी हरभरा डाळ खाल्ल्याने प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळते. रक्तदाब, हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हरभरा डाळ खाणे फायदेशीर असते.

तूर दाळ

तूरीची डाळ खाणे आरोग्यदायी असते. हे प्रथिनांचा चांगला स्त्रोत मानला जातो. तूर डाळ मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांसाठी चांगली असते. तसेच जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅसची समस्या उद्भवू शकते, म्हणून योग्य वेळी योग्य प्रकारे खाणे महत्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com