World Music Day: म्युझिक ऐकण्याचे 'हे' फायदे तुम्हाला ठेवतील एकदम फिट

म्युझिक ऐकल्याने स्ट्रेस, नैराश्यसह अनेक समस्या कमी होतात. जागतिक संगीत दिनानिमित्त जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.
World Music Day:
World Music Day: Dainik Gomantak
Published on
Updated on

World Music Day 2023: दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिनासोबत जागतिक संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 1982 मध्ये फ्रान्समध्ये झाली. जागतिक संगीत दिन जगभरातील 32 पेक्षा अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.

म्युझिक ऐकल्यावर कोणाचाही मुड चांगला होतो. जगात क्वचितच अशी व्यक्ती असेल ज्याला म्युझिक ऐकायला आवडत नसेल. पण तुम्हाला माहिती आहे का की म्युझिक ऐकल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

  • स्मरणशक्ती वाढते

स्मृतिभ्रंश या आजारावर कायमस्वरूपी उपाय नाही. पण म्युझिक थेरपीमुळे आराम मिळू शकतो. स्मरणशक्ती वाढवण्यास मदत मिळते.

  • वजन कमी होते

म्युझिक ऐकल्याने वजन कमी करण्यास देखील मदत करते. म्युझिक ऐकत असताना व्यायाम (Yoga) केल्याने वेगाने व्यायाम केल्यासारखे वाटते. त्यामुळे शारीरिक परिवर्तन वेगाने होते. तसेच एका अभ्यासात असे समोर आले आहे की कमी प्रकाशात आणि मंद आवाजात म्युझिक ऐकताना जेवण कमी प्रमाणात होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

World Music Day:
International Yoga Day 2023: माहिती नसलेले योगाचे 'हे' फायदे वाचा एका क्लिकवर
  • शस्त्रक्रियेत फायदेशीर

शस्त्रक्रियेपूर्वी म्युझिक ऐकणे हे भूल देण्यासारखे कार्य करते आणि मज्जातंतूंना रिलॅक्स करण्यास मदत करते. म्युझिकमुळे शस्त्रक्रियेपूर्वी उद्भवणाऱ्या एंग्जायटीवर मात करण्यास मदत होते.

  • हृदयाचे आरोग्य निरोगी

संशोधनात असे समोर आले की म्युझिक ऐकल्याने हृदयातील (Heart) रक्तप्रवाह सहज होण्यास मदत होते. यासोबतच हृदयाची गतीही कमी होते. तसेच रक्तदाब कमी करण्यास मदत होते.

  • मूड चांगला होतो

म्युझिक ऐकल्याने मूड बूस्ट करण्यास मदत होते. मेंदूतील डोपामाइन हार्मोनचे उत्पादन वाढवतात. यामुळे स्ट्रेस आणि नैराश्य कमी होते.

  • स्ट्रेस कमी होतो

अनेक संशोधनांमध्ये असे सिद्ध झाले आहे की बायोकेमिकल स्ट्रेस ट्रिगर झाल्यानंतर म्युझिक मनाला शांत करते. तसेच स्ट्रेस कमी करते. यामुळे दिवसभरातुन एकदा तरी तुमचे आवडते गाणं ऐकावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com