दरवर्षी 3 जून रोजी जगभरामध्ये सायकलिंग आणि त्याचे फायदे याबद्दल जनजागृती वाढवण्याच्या उद्देशाने जागतिक सायकल दिन (World Bicycle Day 2022) साजरा केला जातो. सायकलच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, सायकल हे केवळ वाहतुकीचे एक साधन नाही, तर पर्यावरणाच्या रक्षणातही सायकचले मोठे योगदान आहे. (World Bicycle Day The cheapest and healthiest means of transportation)
त्यासंबंधीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी माहिती दिली तर संशोधनात असे आढळून आले आहे की, दररोज अर्धा तास सायकल चालवल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, मानसिक आजार, मधुमेह, संधिवात अशा अनेक आजारांपासून आपल्याला वाचवू शकते.
जागतिक सायकल दिनाचा इतिहास
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 3 जून 2018 हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जगभरामध्ये साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील माँटगोमेरी कॉलेजचे प्रोफेसर लेझेक सिबिल्स्की यांनी याचिकेच्या स्वरूपात त्यावेळी दिला होता. 1990 पर्यंत सायकलचा काळ खूपच चांगला होता, पण हळूहळू त्याचे महत्त्व कमी होत गेले. त्याचे महत्त्व पुन्हा सांगण्यासाठी जागतिक सायकल दिन साजरा करण्याचा विचार करण्यात आला होता आणि हा दिवस जाहीर करण्यात आला.
जागतिक सायकल दिनाचे महत्त्व
युनायटेड नेशन्सच्या मते, सदस्य राष्ट्रांना विविध विकास धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, उपराष्ट्रीय, प्रादेशिक विकास धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये सायकलिंगचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहित करणे ही त्यामागील सायकल दिवस साजरा करण्याची कल्पना आहे. याशिवाय, पादचारी सुरक्षा आणि सायकलिंग सुरक्षिततेलाही प्रोत्साहन दिले जाईल. समाजातील सर्व घटकांमध्ये सायकलचा वापर करण्यास प्रोत्साहन करणे तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर सायकल चालविण्यास प्रोत्साहन दिले जाते.
...म्हणून सायकल चालवा
सायकल चालवल्याने वातावरण प्रदूषिण होत नाही.
अर्धा तास सायकल चालवल्याने शरीर तंदुरुस्त राहते.
सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि पचनक्रिया सुरळीत होते.
दररोज सायकलिंग केल्याने मेंदू 15 ते 20 टक्क्यांनी सक्रिय होतो.
सायकलिंग हे वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे असे म्हणायला हरकत नाही.
हृदय आणि फुफुस मजबूत राहतात आणि अनेक घातक आजार आपल्यापासून दूर राहतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.