Workout Tips: वर्कआउटसाठी शुज खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Workout Tips: वर्कआउटसाठी शूज खरेदी करताना अनेक लोक डिझाइन आणि लूककडे अधिक लक्ष देतात.
Workout Tips
Workout TipsDainik Gomantak

Workout Tips: वर्कआउट दरम्यान योग्य शूज घालणे गरजेचे असते. अनेकजण फक्त त्यांची डिझाईन, ब्रँड नेम आणि लूक पाहून शूज खरेदी करतात. पण वर्कआऊट किंवा व्यायामासाठी शूज खरेदी करताना इतर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.

वर्कआउट करताना आपल्या पायांना आणि शरीराला खूप ताण सहन करावा लागतो. त्यामुळे शूजची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. चुकीचे शूज घातल्यास वर्कआउट करतांना समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शूज खरेदी करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

वजनानुसार शूज खरेदी करावे

जर तुमचे वजन जास्त असेल तर ज्याचा सोल जाड आणि टिकाऊ असेल अशा शूजची निवड करावी. कारण, जेव्हा जास्त वजन असते तेव्हा शूजवर जास्त दबाव येतो. त्यामुळे जाड सोल आणि कस्टम मेड शूज अधिक चांगले असतील. अशा शूजचा सोल मजबूत असतो. जो जड भार सहजपणे हाताळू शकतो. हे शूज त्वरीत तुटण्यापासून प्रतिबंधित करेल आणि तुम्हाला आरामदायी वर्कआउट करण्यात मदत करेल.

जागेनुसार शूज निवडा

घरामध्ये किंवा बाहेर, ट्रेडमिलवर किंवा रस्त्यावर वर्कआउट करत असाल तर त्यानुसार शुज खरेदी करावा. कारण वेगवेगळ्या प्रकारचे शूज प्रत्येक ठिकाणी योग्य असतात. इनडोअर वर्कआउटसाठी, मऊ आणि हलके सोल असलेले शूज योग्य असतील, तर घराबाहेर आणि ट्रेडमिलवर, कस्टम मेड, मजबूत आणि आधार देणारे शूज अधिक योग्य असतील. हे लक्षात घेऊन शूज खरेदी केल्यास, व्यायाम करताना अधिक आराम मिळेल.

सपाट तळवे नसणाऱ्यांनी कसे शुज वापरावे

तुमच्या पायाचे तळवे सपाट नसून कमानदार असतील तर तुम्ही विशिष्ट प्रकारचे शूज घालावेत. सामान्य शूज पायांना योग्य आधार देऊ शकत नाहीत. ऑर्थोपेडिक, म्हणजे कमानदार पायांसाठी खास डिझाइन केलेले शूज बनवले जातात. यामध्ये पायाच्या आकारानुसार कमानीचा आधार दिला जातो, ज्यामुळे पायाच्या तळव्याला आणि पायाच्या बोटांना योग्य आधार मिळतो. अशा प्रकारचे खास शूज परिधान केल्याने, कमानीचे पाय असलेले लोक आरामात व्यायाम करू शकतात आणि त्यांना पाठ किंवा पाय दुखण्याचा त्रास होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com