Womens Health: तुम्हालाही सतत थकवा अन् आजारी असल्यासारखं वाटतं? मग असू शकते 'या' तत्वांची कमतरता

अनेक महिला या घर आणि ऑफिस या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने त्यांना थकवा आणि अशक्तपणाला सामोरे जावे लागते.
Womens Health Due to Defeciancy of Elements
Womens Health Due to Defeciancy of ElementsDainik Gomantak
Published on
Updated on

Womens Health Due to Defeciancy of Elements: आजच्या युगात महिलांना दुहेरी काम करावे लागते. अनेक महिला या घर आणि ऑफिसची जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात. पण ही दोन्ही जबाबदारी पार पाडत असतांना महिलांना स्वत:च्या आरोग्याकडे दूर्लक्ष करतात.

त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. शरीरात अनेक गोष्टींची कमतरता असते. विविध प्रकारचे आजार जन्माला येतात.

तुम्हीही सारखे आजारी पडत असाल आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुम्ही नेहमी आजारी पडू शकता. चला जाणून घेऊया असे कोणते पोषक तत्व आहेत जे तुमच्या शरीरात असणे अत्यंत आवश्यक आहे.

  • व्हिटॅमिन डी

महिलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक आजार निर्माण होतात. सांधेदुखी, थकवा येणे हे फक्त व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते.

व्हिटॅमिन डी हाडांच्या चयापचयामध्ये, स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि त्यांची कार्य करण्याची क्षमता सुधारण्यास मदत करते.

तसेच कॅल्शियमचे शोषण होण्यास मदत करते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकसारखे धोके वाढतात.

व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी सूर्यप्रकाश घ्यावा. याशिवाय दूध, मासे, अंड्यातील पिवळ बलक, संत्र्याचा रस यांचा आहारात समावेश करू शकता.

  • ओमेगा-3 फॅटी ऍसिड

ओमेगा 3 फॅटी ऍसिडच्या कमतरतेमुळे मानसिक समस्या देखील उद्भवू शकतात. कोणत्याही महिलेच्या शरीरात ओमेगा 3 फॅटी ऍसिडची कमतरता असते तेव्हा विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती कमी होऊ लागते.

यामुळे नैराश्याच्या तक्रारी आणि चिंता निर्माण होते. त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी महिलांनी सोया, अक्रोडाचे तुकडे, फ्लेक्स बियाणे, एवोकॅडो, मासे, अंडी खाऊ शकता.

Womens Health Due to Defeciancy of Elements
Anti Cancer Foods: 'या' फळं अन् भाज्या खाल्यास कॅन्सरचा धोका 40% कमी होऊ शकतो
  • आयर्न

महिलांमध्ये अनेकदा लोहाची कमतरता जाणवते. त्यामुळे अशक्तपणाचा धोकाही कायम राहतो. दर महिन्याला मासिक पाळी येत असल्याने महिलांमध्ये अशक्तपणा जाणवतो. रक्ताच्या कमतरतेमुळे महिलांना अशक्तपणा जाणवू शकतो.

खर तर, शरीरात पुरेसे लोह नसताना, तुमच्या रक्तात निरोगी लाल रक्तपेशींची कमतरता असते, या लाल रक्तपेशी शरीराच्या ऊतींना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करतात.

याच्या कमतरतेमुळे ऊती नष्ट होऊ लागतात आणि तुम्हाला थकवा, श्वास घेण्यात अडचण, हृदयाचे ठोके अनियमित होणे, रंग फिकट होणे, डोळे पिवळे पडणे असे त्रास होतात.

त्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुमच्या आहारात पालक, मासे, बीटरूट, मांस यांचा आहारात समावेश करावा.

  • प्रथिने

प्रथिनांच्या कमतरतेमुळे महिलांनाही अनेक आजार उद्भवू शकतात. प्रथिनांमुळे स्नायू मजबूत होतात. चयापचय आणि कॅलरी बर्न करण्याची क्षमता देखील वाढवते. केस, त्वचा, नख शरीरासाठी प्रथिने आवश्यक असतात.

प्रथिनांच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो. याची कमतरता भरून काढण्यासाठी अंडी, बीन्स, मसूर, सुका मेवा, सोया, दुग्धजन्य पदार्थ, संपूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करावा.

  • कर्बोदके

कार्बोहायड्रेट्सच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात ऊर्जा कमी होऊ शकते. यामुळे देखील तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो.

यामुळे डोकेदुखी, मळमळ होणे, एकाग्रता कमी होणे या समस्या जाणवतात. याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नाचणी, बाजरी, ज्वारीचा समावेश करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com