Women's Day 2024: 'हे' सुपरफूड खाल्ल्यास वयाच्या 50 व्या वर्षीही दिसाल फिट

Women's Day 2024: महिलांना 50 व्या वर्षी फिट राहायचे असेल तर पुढील सुपरफूडचा आहारात समावेश करावा.
Women's Day 2024
Women's Day 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Womens Day 2024 these superfood helps stay fit age of 50

धावपळीच्या जीवनमान आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक आजार उद्भवू शकतात. जर तुम्हाला 50 व्या वर्षी देखील फिट राहायचे असेल तर आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. काही खाद्यपदार्थांचा सुपरफूड्सप्रमाणे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व आणि रजोनिवृत्तीपूर्वी आणि नंतरचे सिंड्रोम यासारख्या समस्या टाळण्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात काही सुपरफूडचा समावेश करावा.

आवळा

आवळा खाणे आरोग्यदायी असते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. व्हिटॅमिन सी चा चांगला स्त्रोत मानला जातो. केवळ महिलांनीच नाही तर सर्व वयोगटातील लोकांनी आवळा रोज खावा. याशिवाय आवळ्यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, बी, फायबर, प्रोटीन, लोह आणि मॅग्नेशियम देखील असते. हे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, पचनक्रिया सुधारते आणि मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. याशिवाय, यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि केस लांब आणि दाट होतात. तुम्ही दररोज 1 कच्चा आवळा, पावडर, रस इत्यादी घेऊ शकता.

खजूर

महिलांना एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि 70 टक्के गृहिणी/महिला कामाच्या प्रचंड ताणामुळे त्यांच्या आरोग्याशी तडजोड करतात. अशा महिलांनी आपल्या आहारात खजूरचा समावेश करावा. हे सुपरफूड उत्साहवर्धक आहे, जे अशक्तपणा आणि आळस दूर करते, शरीरात लोहाची पातळी वाढवते आणि मासिक पाळी नियमित करते.

काळे मनुके

काळे मनुके खाणे अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. रोज सकाळी काळ्या मनुका खावे. यामुळे लोहाची पातळी वाढवते, आतडे स्वच्छ करते, मन शांत ठेवते, उच्च पित्ताचे प्रमाण कमी करते आणि शरीराला पुरेसे पोषण देते.

तीळ

तीळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. ज्या लोकांना वाताची आणि मासिक पाळीच्या वेदना आणि क्रॅम्पची समस्या असते ती कमी होते. मासिक पाळीच्या 15 दिवस आधी 1 चमचे भाजलेले तीळ खावे.

नारळ

नारळासह नारळ पाणी पिणे देखील आरोग्यदायी असते. त्यामुळे पित्त आणि वातदोष दूर होतात. नारळ शारीरिक शक्ती वाढवते, हाडे निरोगी ठेवते, थायरॉईडचे योग्य कार्य करण्यास मदत करते आणि स्त्रीरोगविषयक विकार दूर करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com