Aerobics Exercise: वजन अन् तणाव कमी करण्यासाठी महिलांनी करावे 'हे' एरोबिक्स एक्सरसाइज

महिलांनी वजन आणि तणाव कमी करण्यासाठी एरोबिक्स एक्सरसाइज करणे फायदेशीर ठरते.
Weight loss tips
Weight loss tipsDainik Gomantak

Aerobic Exercise For Weight Loss: तुम्हीही वाढते वजन आणि तणावामुळे त्रस्त आहात का? वजन आणि तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला लाइफस्टाइलमध्ये काही फिटनेस टिप्स फॉलो कराव्या लागतील.

महिलांनी नियमितपणे काही एरोबिक्स एक्सरसाइज केले पाहिजेत. यामुळे त्यांचे शारिरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहते. चालणे,सायकलिंग,पोहणे यासारखे एरोबिक्स एक्सरसाइज महिलंना फिट ठेऊ शकतात.

  • डान्स

डान्स केल्याने देखील वजन कमी करण्यास मदत मिळते. डान्स हा एक एरोबिक्स एक्सरसाइज आहे. यामुळे महिलांचा तणाव आणि वजन कमी करण्यास मदत होते. डान्समुळे शरीर लवचिक राहते. हे मूड वाढवणारे हार्मोन्स एंडोर्फिन वाढवते ज्यामुळे तणाव कमी होतो. डान्समुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात. हृदयाचे आरोग्य फिट राहते. तुम्ही झुंबा, साल्सा, हिप हॉप सारखे डान्स प्रकार वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

  • जंपिंग जॅक करावा

जंपिंग जॅक हा एक अतिशय चांगला एरोबिक्स एक्सरसाइज आहे. जो महिलांनी वजन कमी करण्यासाठी करावा. जंपिंग जॅकमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. विशेषतः पाय, पोट आणि पाठीचे स्नायू लवचिक होतात. तसेच पचनसंस्था सुरळित कार्य करते. बद्धकोष्ठता आणि पोटासंबंधित आजार दूर राहतात.

Weight loss tips
Parenting Tips: पालकांमध्ये असलेल्या 'या' सवयी मुलांना बनवतात आयुष्यात यशस्वी
  • सायकलिंग करणे

सायकलिंग केल्याने शरीराचा व्यायाम होतो. सायकल चालवताना हात, पाय, पाठ, पोटाचे स्नायू, हृदय आणि फुफ्फुस योग्यरित्या काम करतात. यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. तसेच तणाव कमी होण्यास मदत होते आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. त्यामुळे महिलांनी आठवड्यातून किमान 30-45 मिनिटे सायकलिंग करावे.

  • स्विमिंग करणे

प्रत्येक महिलेला स्विमिंग करता यायला हवे. स्विमिंगचे अनेक फायदे होतात. स्विमिंग केल्याने मुड फ्रेश राहतो आणि तणाव कमी होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com