Food To Boost Stamina: स्टॅमिना वाढवण्यासाठी 'या' 4 पदार्थांचे करावे सेवन

तुम्हालाही थोडा व्यायाम केल्यावर जर थकवा जाणवत असेल तर या पदार्थांचे सेवन करावे.
Food To Boost Stamina
Food To Boost StaminaDainik Gomantak

Food To Boost Stamina And Energy: तुम्हालाही थोडे काम केल्यावर थकवा जाणवतो का? तर शरिरात स्टॅमिना कमी असल्याचे हे लक्षण आहे. ज्यामुळे शरिरात थकवा जाणवतो.

त्यामुळे तुम्हाला थोडा व्यायाम केल्यावर लगेच थकवा येतो. तुम्हाला जर स्टॅमिना वाढवायचा असेल तर काही पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

  • ड्रायफ्रुट्स

शरिरातील स्टॅमिना वाढवण्यासाठी बदाम, अक्रोड, सब्जा आणि फ्लेक्स सीड्सचे सेवन करावे. त्यामध्ये हेल्दी फॅट आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे पदार्थ स्टॅमिना वाढवतात आणि दीर्घकाळ टिकवतात.

  • केळी

केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. केळीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यासोबतच ऊर्जा देण्यासही मदत करतात. व्यायामानंतर केळी खाल्ल्यामुळे तुमचा थकवा दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर केळी खाऊ शकता.

  • क्विनोआ सॅलेड

क्विनोआ सॅलड किंवा उपमा स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. आहारात भाज्यांनी युक्त हे संपूर्ण धान्यांचे सेवन करावे. त्यामुळे शरीराचा स्टॅमिना वाढण्यास मदत होते. ज्यांना जुनाट आजार आहेत. त्यांच्यासाठीही क्विनोआ फायदेशीर आहे. प्रथिनेयुक्त क्विनोआ खाल्ल्याने ऊर्जा मिळते. जी दीर्घकाळ टिकते आणि आवश्यक पोषण देखील मिळते.

  • कडधान्ये

स्टॅमिना वाढवण्यासाठी मूग, हरभरा, डाळी, यांचे सेवन करावे. यामध्ये फायबर, प्रथिने आणि लोह जास्त असते. जे थकवा दूर करण्यासोबतच स्टॅमिना वाढवते. ज्यामुळे तुम्ही बराच वेळ व्यायाम करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com