Manish Jadhav
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर असल्याने हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी आणि फ्लूशी लढण्यासाठी हा ज्यूस तुमची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) तात्काळ वाढवतो.
मोसंबीतील आम्ल घटक (Citric Acid) शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करतात आणि रक्ताचे शुद्धीकरण करतात, ज्यामुळे त्वचा तजेलदार राहते.
हिवाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात. मोसंबीचा रस पचन क्रिया सुधारतो, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतो.
थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचा निस्तेज होते. मोसंबीमधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचा हायड्रेटेड ठेवतात आणि चमक वाढवतात.
हिवाळ्यात येणारा आळस दूर करण्यासाठी मोसंबीचा रस एक उत्तम नैसर्गिक ऊर्जा पेय आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साह टिकवून ठेवण्यास मदत होते.
थंडीत पाणी पिणे कमी होते. मोसंबीचा ज्यूस शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखतो आणि डिहायड्रेशन (Dehydration) टाळतो.
कमी कॅलरी (Low Calorie) आणि उच्च फायबर (High Fiber) असल्यामुळे मोसंबीचा ज्यूस भूक नियंत्रित ठेवतो, ज्यामुळे हिवाळ्यात वजन वाढणे टाळता येते.
मोसंबीचे तुकडे करा, बिया काढा, मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्या. नंतर चाळणीने गाळून काढा. साखरेऐवजी मध आणि चिमूटभर काळं मीठ वापरल्यास चव वाढेल.