Winter Care : हिवाळा सुरू होताच लोकांचे स्वेटर, टोपी बाहेर येतात. तसेच गरम चहा आणि पकोडे खाण्यास सुरुवात करतात. पण थंडीच्या वातावरणात तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करून तुम्हाला आजारी बनवू शकतात. हिवाळ्यात आपली शारीरिक क्रिया थोडी कमी होते. ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या उर्जेवर आणि प्रतिकारशक्तीवर होतो. शरीराची उर्जा पातळी आणि प्रतिकारशक्ती राखण्यासाठी व्यक्तीने थंडीच्या काळात या पाच पदार्थांपासून दूर राहावे.
साखरेपासून बनवलेल्या गोष्टी
साखरेपासून बनवलेल्या गोष्टी आणि थंडीचे कॉम्बिनेशन तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. साखरेमुळे जळजळ होऊ शकते. ज्यामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. गोडाची लालसा कमी करण्यासाठी तुम्ही हंगामी फळांची मदत घेऊ शकता.
तळलेले पदार्थ
हिवाळ्यात (Winter) चहासोबत गरमागरम पकोडे खाण्याची इच्छा होते. पण तुमची ही चव तुमची पचनक्रिया बिघडू शकते. तळलेल्या गोष्टी पचायला जास्त वेळ लागतो आणि हा तुमच्या आरोग्यासाठीही आरोग्यदायी पर्याय नाही. हे तुमचे मेटाबॉलिज्म रेट कमी करून तुम्हाला आळशी आणि सुस्त वाटू शकते.
शेंगदाण्यापासून बनवलेली चिक्की
शेंगदाण्यापासून बनवलेली चिक्की किंवा गुळपापडी हिवाळ्यात खूप आवडते. पण हे तुमचे वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण बनू शकते. गुळापासून बनवलेले असले तरी त्यात भरपूर साखर असते. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे त्यांचे वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतील तर साखरेचे सेवन टाळा.
कोल्ड ड्रिंक्स
सोडा किंवा कोल्ड्रिंक्समुळे शरीराची रोगप्रतिकारक (Immunity) शक्ती कमी होते. थंड पेयाचे तापमान शरीराच्या तापमानापर्यंत आणण्यासाठी शरीराला भरपूर ऊर्जा लागते.
प्रिजर्व्ड फूड
कॅन केलेले पदार्थ किंवा लोणच्यामध्ये टाकले गेलेले एक्स्ट्रा मीठ आणि तेल त्यांची शेल्फलाइफ तर वाढवते, पण हे फूड्स प्रिझर्व्ह करण्याची ही प्रोसेस तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक घटक नष्ट करु शकतात. काही लोकांना त्याची एलर्जी देखील असू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.