Winter Health Yoga: हिवाळ्यात 'ही' 3 योगासने हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Winter Health Yoga: हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी योगा करणे फायदेशीर ठरु शकते.
Winter Health Yoga
Winter Health YogaDainik Gomantak

हिवाळ्यात बदलत्या ऋतूनुसार आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पण, थंडीमुळे शरीरात सतत आळसपणा येतो आणि काहीच काम न करण्याची इच्छा होते. पण, दिवसभर अंथरूणात राहिल्याने किंवा काहीच काम न केल्याने शरीरासाठी धोकादायक ठरु शकते. यामुळे हिवाळ्यात (Winter) निरोगी आणि फ्रेश राहण्यासाठी योगा करावा.

आरोग्यतज्ञांच्या मते, हिवाळ्यात आहार (Diet) आणि व्यायामाकडे (Yoga) अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला रोज व्यायामासाठी जिममध्ये जाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही घरीच तीन सोपे योगासने करुन शरीरातील वेदनाही दूर करू शकता.

Adho mukha svanasana
Adho mukha svanasanaDainik Gomantak
  • अधोमुख श्वानासन (Dog Pose)

हे योगासन केल्याने पोटाच्या खालच्या भागाचे स्नायू मजबूत होतात. यासोबतच पाठीचा कणाही मजबूत असतो. हे योगासन आरोग्यासाठी फायदेशीर असते. हाता-पायांचे दुखणे बरे होते.यकृत आणि किडनीशी संबंधित आजारही बरे होतात. 

  • पदहस्तासन

    हे योगासन केल्याने हृदयाचे (Health) आरोग्य चांगले राहते. तसेच हृदयामधील रक्त प्रवाह सुरळित कर्य करतो. यासोबतच पोटाची चरबी कमी करण्यासोबतच पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आणि उंची वाढविण्याचे काम करते. 

Uttanasana
UttanasanaDainik Gomantak
  • चक्रासन

हे योगासन केल्याने वजन नेहमी नियंत्रणात राहते. तसेच शरीर लवचिक असते. त्याचे फायदे असे आहेत की, असे केल्याने ते टाईप 2 मधुमेहामध्ये (Diabetes) फायदेशीर ठरते. आणि पाठीचा कणा सरळ राहतो. 

Chakrasana
ChakrasanaDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com