Dream Meaning: मी रात्री गाढ झोपलो आणि.....नशीब!! स्वप्नं आपल्याला काही सांगू पाहतायत का?

Causes Types and Meaning Of Dreams: पण आपण कधीच अपघाताचा किंवा डोंगरावरून कोसळण्याचा विचार करत नाही मग अशी स्वप्नं आपला पिच्छा का करत असतील?
Causes Types and Meaning Of Dreams: पण आपण कधीच अपघाताचा किंवा डोंगरावरून कोसळण्याचा विचार करत नाही मग अशी स्वप्नं आपला पिच्छा का करत असतील?
why do we dream?Dainik Gomantak
Published on
Updated on

Scientific Explanation of Dreaming in Marathi

मी रात्री गाढ झोपलो होतो, "अचानक एका भाला मोठा डोंगर दिसला आणि मी त्यावरून धाड्कन खाली पडलो, एका क्षणी वाटलं जीव गेला की काय पण ते एक स्वप्न होतं." नशीब!! असं तुमच्यासोबत सुद्धा अनेकवेळा झालं असेल ना? आपण जे स्वप्न बघतो त्याचा आणि आपला काही संबंध असतो का? मराठीत एक प्रचलित म्हण आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे, म्हणजे आपण दिवसभरात एवढा विचार करतो की रात्री देखील ते स्वप्नाच्या रूपाने आपल्यासमोर उभं राहतं?

पण आपण कधीच अपघाताचा किंवा डोंगरावरून कोसळण्याचा विचार करत नाही मग अशी स्वप्नं आपला पिच्छा का करत असतील? आणि सर्वात महत्वचं म्हणजे स्वप्नं केवळ माणसांना पडतात की प्राणी सुद्धा स्वप्न बघत असतील?

आपण रोज रात्री स्वप्नं बघतो:

स्वप्नाबद्दल अजूनही अनेक वैज्ञानिकांचे एकमत झालेलं नाही, मात्र स्वप्नं अनेक प्रकारची असू शकतात यावर मात्र वैज्ञानिक एकमताने 'हो' असं म्हणतात. काही स्वप्न आनंददायी असतात तर काही भयंकर. काही स्वप्नं पुढेच अनेक दिवस लक्ष्यात राहणारी असतात तर काही आपण उठल्याउठल्या विसरून जातो.

प्रत्येक माणसाच्या विचारशक्तीनुसार त्याची स्वप्नं बदलत असतात. तुम्हाला माहितीये का आपण रोज रात्री एक स्वप्न बघत असतो, कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण अभ्यासातून ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. रात्रीच्यावेळी आपला मेंदू काम करत असतो आणि अशावेळी फोरब्रेन आणि मिडब्रेन यांच्यात झालेल्या हालचालींमुळे आपण स्वप्न बघू लागतो. प्रत्येक माणूस रात्रीच्यावेळी किमान दोन तास स्वप्न बघत असतो.

Causes Types and Meaning Of Dreams: पण आपण कधीच अपघाताचा किंवा डोंगरावरून कोसळण्याचा विचार करत नाही मग अशी स्वप्नं आपला पिच्छा का करत असतील?
Dream Interpretation: स्वप्नात हिरवे झाडं दिसणे काय सुचित करते? वाचा एका क्लिकवर

तुम्हाला प्रश्न पडला असले की एवढी स्वप्नं आपण विसरतो तरी कशी? आपल्या मेंदूमध्ये फ्रन्टल लोब नावाचा एक भाग असतो जो आपल्यासाठी स्मृती निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो मात्र या भागाची क्रिया झोपेदरम्यान निष्क्रिय असल्याने सकाळी स्वप्नं लक्षात राहत नाहीत.

पुरुष आणि स्त्रियांची स्वप्नं वेगळी असतात:

तुम्हाला माहितेय का? काही वैज्ञानिकांच्या मते पुरुष आणि स्त्रिया यांच्या स्वप्नांमध्ये देखील खूप मोठी तफावत असते. मुलं जास्तीत जास्त प्रमाणात युद्ध, शस्त्र यांसारख्या गोष्टींची स्वप्नं पाहतात तर महिलांची स्वप्नं कपडे आणि तत्सम गोष्टींबद्दल असतात. तसंच पुरुष हे अनेकवेळा केवळ पुरुषांबद्दल स्वप्न पाहत असतात, मात्र महिलांच्या स्वप्नांमध्ये पुरुष आणि स्त्री याचा समतोल असतो. महिला पुरुषांपेक्षा अधिककाळ स्वप्नं पाहू शकतात असेही एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

नकारात्मक स्वप्नं:

अधिकवेळा माणूस केवळ नकारात्मक स्वप्नांमध्ये गुंतलेला असतो आणि यात त्याच्या मानसिक आरोग्याचा फार मोठा वाटा आहे. आपण अनेकवेळा कळत-नकळतपणे स्ट्रेस किंवा एन्झाईटीचा सामना करत असतो. कित्येक गोष्टी मनात दडून असतात, आपल्याला भीती दाखवत असतात. आपण ज्या वातावरणात वावरतो त्याचा थेट परिणाम आपल्या स्वप्नांवर होत असतो.

प्राणी स्वप्न बघतात का?

तुम्ही कधी मांजर किंवा कुत्र्याला झोपेत शेपूट हलवताना किंवा विचित्र आवाज काढताना पाहिलं आहे का? याचा अर्थ ते स्वप्न बघतायत असा होतो? कदाचित हो! प्राणी स्वप्न बघू शकतात की नाही यावर अजून नीट अभ्यास झालेला नाही मात्र तरीही काही वैज्ञानिकांच्या मते प्राण्यांना देखील स्वप्न पडण्याची शक्यता अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com