Omicron XBB.1.5 : काय आहे नवीन Omicron Subvariant XBB.1.5 व्हायरस, जाणून घ्या...

XBB.1.5 व्हेरियंट यूएसमध्ये डिसेंबर महिन्यात 4% वरून 40% पेक्षा जास्त प्रमाणात फैलावला आहे.
Omicron XBB.1.5 | Omicron Subvariant XBB.1.5
Omicron XBB.1.5 | Omicron Subvariant XBB.1.5Dainik gomantak
Published on
Updated on

नवीन omicron subvariant XBB.1.5 व्हायरसची अमेरिकेमध्ये वेगाने वाढ होत आहे.  त्यामुळे तेथील सार्वजनिक आरोग्य अधिकार्‍यांसमोर हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे.  XBB.1.5, XBB चे व्हेरियंट, यूएस मध्ये कोविड-19 संक्रमणांपैकी फक्त 4% वरून डिसेंबर महिन्यात 40% पेक्षा जास्त प्रमाणात फैलावला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. XBB.1.5 देखील अशा वेळी पसरत आहे जेव्हा बिडेन प्रशासनाच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सुट्टीच्या दिवशी मेळाव्यानंतर हिवाळ्यात वाढ होण्याच्या शक्यतेचा इशारा दिला होता. व्हाईट हाऊसचे समन्वयक आशिष झा यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले,  "तुम्हाला जुलैच्या आधी संसर्ग झाला असेल किंवा तुमची शेवटची लस सप्टेंबरमध्ये बायव्हॅलेंट अपडेट होण्यापूर्वीची असेल तर XBB.1.5 संसर्गापासून तुम्हाला धोका संभवतो.

तसेच झा म्हणाले की "XBB.1.5 इतर ओमिक्रॉन स्ट्रेनपेक्षा अधिक गंभीर आहे अशा केसेस अजूनतरी समोर आल्या नाहीत परंतु त्यावर संशोधन चालू आहे. XBB.1.5 कोरोनाव्हायरस लाटेला कितपत चालना देईल की नाही हे अनेक घटकांवर अवलंबून आहे, लोकांची रोग प्रतिकारशक्ती आणि लोक स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय कृती करतात, जसे की मास्क घालणे आणि बूस्टर डोस घेणे या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहेत.

तर व्हॅन केरखोव्हच्या म्हणण्यानुसार, "विषाणू सेलला चिकटून राहत असल्याने ते अधिक संक्रमणीय आहे. आम्ही त्याच्या वाढीबद्दल चिंतित आहोत. युरोप आणि ईशान्य यू.एस. मध्ये, जेथे XBB.1.5 ने वेगाने प्रसारित होत आहेत." अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त रॉबर्ट कॅलिफ यांच्या म्हणण्यानुसार, "अन्य प्रदेशात यांचा लवकर प्रसार होण्याचीही दाट शक्यता आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com