काय आहे CAR-T सेल थेरपी? कर्करोगाच्या उपचारात ती किती प्रभावी? जाणून घ्या

CAR-T Cell Therapy For Cancer: कॅन्सरचा उपचार सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही, परंतु विज्ञानाच्या नवीन शोधांद्वारे रुग्णांना चांगले उपचार देणे सोपे होत चालले आहे.
CAR-T Cell Therapy For Cancer
CAR-T Cell Therapy For CancerDainik Gomantak
Published on
Updated on

CAR-T Cell Therapy A New Hope for Cancer Treatment

कॅन्सरचा उपचार सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही, परंतु विज्ञानाच्या नवीन शोधांद्वारे रुग्णांना चांगले उपचार देणे सोपे होत चालले आहे. या संदर्भात, रुग्णांना कॅन्सरवर योग्य आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी एक नवीन थेरपी विकसित करण्यात आली आहे. या नवीन थेरपीचे नाव 'CAR-T सेल थेरपी' आहे, जी कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यात प्रभावी ठरत आहे. ही एक प्रकारची विशेष इम्युनोथेरपी आहे, ज्यामध्ये कॅन्सरशी लढण्यासाठी शरीराची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत केली जाते. या थेरपीचा अनेक रुग्णांना फायदा झाला आहे, विशेषतः ब्लड कॅन्सरच्या रुग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत.

CAR-T सेल थेरपी म्हणजे काय?

या थेरपीमध्ये, रुग्णाच्या शरीरातून टी-पेशी काढून टाकल्या जातात. या टी-पेशी शरीराच्या संरक्षण प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग असून रोगांशी लढण्यास मदत करतात. शास्त्रज्ञ या पेशींमध्ये काइमेरिक अँटीजेन रिसेप्टर (CAR) नावाचे एक खास प्रोटीन जोडतात. हे प्रोटीन टी-पेशींना कॅन्सरच्या पेशी ओळखण्याची आणि नष्ट करण्याची शक्ती देते.

CAR-T Cell Therapy For Cancer
Lung Cancer: धूम्रपान न करणाऱ्या महिलांनाही फुफ्फुसाचा कर्करोग; WHO च्या अहवालात धक्कादायक माहिती

कॅन्सरच्या उपचारात ही थेरपी किती फायदेशीर?

कॅन्सरच्या (Cancer) उपचारात ही थेरपी खूप प्रभावी मानली जाते. विशेषतः अशा रुग्णांसाठी जे केमोथेरपी किंवा रेडिएशनला प्रतिसाद देत नाहीत. या तंत्राचा कॅन्सरच्या पेशींवर थेट परिणाम होतो. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये रुग्ण पूर्णपणे बरे देखील झाले आहेत. ल्युकेमिया आणि लिम्फोमा सारख्या ब्लड ककॅन्सरसाठी ही थेरपी खूप फायदेशीर ठरली आहे. याशिवाय, ही थेरपी शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती देखील मजबूत करते, ज्यामुळे कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता कमी होते.

CAR-T सेल थेरपी

ही थेरपी खूप प्रभावी आहे, परंतु यासंबंधी काही आव्हाने देखील आहेत. सर्वात मोठे आव्हान म्हणजे, ही थेरपी खूप महाग आहे, ज्यामुळे प्रत्येक रुग्णाला त्याचा फायदा होऊ शकत नाही. याशिवाय, काही रुग्णांना ताप, लो ब्लड प्रेशर आणि मानसिक भ्रम यासारखे दुष्परिणाम देखील जाणवतात. ही थेरपी सध्या फक्त काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरसाठीच उपलब्ध आहे. इतर प्रकारच्या कॅन्सरसाठी अधिक संशोधन चालू आहे.

CAR-T Cell Therapy For Cancer
Breast Cancer: महिलांनो स्तनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको; कर्करोगाची 'ही' लक्षणं तुमच्यात तर नाहीत ना?

कॅन्सरच्या उपचारात ही थेरपी प्रभावी ठरणार

ही थेरपी स्वस्त आणि अधिक प्रभावी बनवण्यासाठी शास्त्रज्ञ काम करत आहेत. जर ही थेरपी स्वस्त झाली तर लाखो कॅन्सर रुग्णांना फायदा होऊ शकेल. याशिवाय, इतर प्रकारच्या कॅन्सरच्या उपचारांमध्येही या थेरपीचा वापर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. येत्या काळात, यामुळे कॅन्सरच्या उपचारांमध्ये मोठा बदल होऊ शकतो. विशेष म्हणजे, कॅन्सर रुग्णांसाठी ही थेरपी नवीन आशा बनू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com