नेमकी काय आहे शॅम्पेन वाइन...!

शॅम्पेन स्पार्कलिंग वाइन मध्ये 11 टक्के अल्कोहोल चे प्रमाण असते.
 champagne wine
champagne wineDainik Gomantak
Published on
Updated on

आजकाल पार्टी ही एक फॅशन बनली आहे. तसेच पार्टी म्हटलं शॅम्पेन आलीचं. अशा पार्ट्यांमध्ये युवक-युवती शॅम्पेनचा आस्वाद घेतातच. मात्र आता सातत्याने अशा शॅम्पेन पिण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र नेमकी शॅम्पेन कशी असते, कशी बनवली जाते, याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतील? त्यात अल्कोहोल किती असते ? ते कसे बनवले जाते ? आणि त्याच्या नावाचा इतिहास (History) काय चला तर मग जाणून घेऊया. (What is the difference between champagne & wine and its procedure)

शॅम्पेन म्हणजे काय?

शॅम्पेनच्या बाटलीत काय असते हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. वास्तविक, शॅम्पेन स्वतः एक वेगळा पदार्थ नाही. शॅम्पेन (Champagne) म्हणजे स्पार्कल वाइन. ही वाइन स्पार्कल वाइन असते, जी खास प्रकारे तयार केली जाते. त्यामुळे शॅम्पेनमध्ये छोटे बुडबुडे दिसतात आणि त्यामुळे ‘गॅस’ (Gas) तयार होतो. म्हणूनच त्यास स्पार्कल वाइन म्हणतात.

 champagne wine
विली गोएसांचा 'माय हजबंड्‍स मिस्टरिअस मिस्ट्रेस' इंग्रजी कथांचा संग्रह

शॅम्पेन कसे तयार केले जाते?

शॅम्पेन किंवा स्पार्कल वाइन कशी बनवली जाते हे जाणून घेऊया. सर्वप्रथम, सर्व प्रकारच्या द्राक्षांचा (grapes) रस काढला जातो आणि त्यात काही पदार्थ मिसळून ते आंबवण्यासाठी ठेवले जातात. यासाठी ते प्रथम टाकीमध्ये ठेवले जाते आणि किण्वन प्रक्रियेत दीर्घकाळ म्हणजे बरेच महिने ठेवले जातात. त्यानंतर तो रस बाटलीत भरला जातो.

त्यानंतर बाटल्या अनेक महिने उलट्या ठेवल्या जातात आणि पुन्हा आंबवण्याची प्रक्रिया सुरु केली जाते. ते उलटे ठेवल्यामुळे त्यात कार्बन डायऑक्साइड आणि अल्कोहोल तयार होते. बराच वेळ असे केल्यावर झाकणाच्या जागी कॉर्क लावले जाते. ते प्रथम बर्फात ठेवले जातात. त्यानंतर मग दाब देऊन बर्फ आणि घाण बाहेर काढली जाते. यानंतर, पुन्हा बाटली अनेक दिवस उलटी ठेवली जाते आणि त्यानंतर अखेर स्पार्कलिंग दारु तयार होते.

शॅम्पेन नावाचा इतिहास

सर्व वाइन या शॅम्पेन वाइन आहेत, परंतू असे नाही की, सर्व वाइन या शॅम्पेन स्पार्कलिंग असणार. ते कसे आहे ते समजून घेऊया. शॅम्पेन हा एक लफ्रान्समधील एक प्रदेश आहे, ज्याचे नाव शॅम्पेन आहे, फ्रान्सच्या (France) शॅम्पेन प्रदेशात बनवलेल्या स्पार्कलिंग वाइनला शॅम्पेन म्हणतात. ही शॅम्पेन वाइन त्या प्रदेषाशी संबंधित आहे.

इतर देशांमध्ये सुध्दा स्पार्कलिंग वाईन बनवली जाते. तेथे बनविलेली स्पार्कलिंग वाईन ही वेगळ्या नावाने ओळखली जाते. स्पेनची स्पार्कलिंग वाईन इटनी व्यतिरिक्त वेगळ्या नावाने ओळखली जाते. जर ती भारतात बनवली गेली असेल तर ती फक्त स्पार्कलिंग वाईन म्हणून ओळखली जाते.

 champagne wine
प्रायव्हसी जपा; स्पष्टता व अर्थ

शॅम्पेनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती ?

शॅम्पेन स्पार्कलिंग वाइनमध्ये 11 टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते. जी एक प्रकारची वाइन असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com