Weight Loss Tips
Weight Loss TipsDainik Gomantak

Weight Loss Tips: जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिममध्ये पैसे घालवत असाल तर वाचा रिसर्च

कॅलरी बर्न करण्यासाठी लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिम, जॉगिंगची मदत घेतात, परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, घराची साफसफाई करून, जिममध्ये जाऊन जेवढे परिणाम मिळतात तेच परिणाम तुम्ही मिळवू शकता.
Published on

Weight Loss Tips: जर तुम्ही घरातील काम टाळत असाल तर स्टडी तुम्हाला त्या कामाच्या प्रेमात पाडेल. यानुसार, जर तुमचे वजन खूप वाढले असेल आणि कॅलरीज वाढल्या असतील, तर घरकाम केल्याने कॅलरी सहज आणि जलद बर्न होतात, लठ्ठपणा कमी होतो आणि वजन कमी होते. 

बर्‍याचदा लोकांना जिम, जॉगिंगच्या मदतीने कॅलरीज बर्न करायच्या असतात. पण नुकत्याच झालेल्या एका स्टडीमध्ये असे म्हटले आहे की, घराची साफसफाई करून तुम्ही जिममध्ये जाऊन जेवढे परिणाम मिळवू शकता तेच परिणाम तुम्हाला मिळू शकतात. जाणून घेऊया काय सांगतो हा स्टडी.

  • घराची साफसफाई केल्याने कॅलरी जलद बर्न होईल

होम क्लिनिंग सर्व्हिस कंपनी होमग्लोने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे. घराची साफसफाई केल्याने कॅलरीज जलद बर्न होतात. त्यांच्या अभ्यासात, कंपनीने 10 व्यावसायिक क्लिनर्सना Fitbits परिधान करतांना 5 घरे स्वच्छ करण्यास सांगितले. त्यानंतर प्रत्येक खोली साफ करताना त्यांनी किती कॅलरी बर्न केल्या याचे विश्लेषण केले. ज्यामध्ये धक्कादायक निकाल समोर आला आहे.

  •  साफसफाईमुळे किती कॅलरीज बर्न होतात

या स्टडीमध्ये असे आढळून आले की, 1 बीएचके फ्लॅटची साफसफाई करणाऱ्या व्यावसायिक क्लिनर्सद्वारे सरासरी 830 कॅलरीज जळतात. हा परिणाम दीड तासांहून अधिक तीव्र व्यायामासारखा आहे. 3 BHK मध्ये साफसफाई करतांना 1,311 कॅलरीज बर्न झाल्या आहेत.

Weight Loss Tips
Foldable Smartphones: पुन्हा येणार फोल्डेबल स्मार्टफोनचा जमाना... 2027 पर्यंत मागणी इतक्या कोटींवर पोहचण्याचा अंदाज
  • स्वयंपाकघर स्वच्छ केल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात

या अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक क्लीनरने स्वयंपाकघर साफ करताना जास्तीत जास्त कॅलरीज बर्न केल्या. या दरम्यान, सरासरी 276 कॅलरीज बर्न झाल्या. हे 40 मिनिटे जॉगिंग करण्यासारखे आहे. 

अभ्यासाचा परिणाम असे सूचित करतो की कॅलरी बर्न करण्यात जिमपेक्षा स्वच्छता चांगले परिणाम देऊ शकते. किचनमध्ये स्क्रबिंग आणि मॉबिंग केले जात असेल तर वजन राखण्यासाठी वेगळी कसरत करावी लागत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com