Diabetes Risk: शरीरातील 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मधुमेह

Diabetes Risk: फक्त गोड पदार्थ खाल्ल्यानेच मधुमेह होतो असे नाही तर काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे देखील मधुमेह होऊ शकतो.
Diabetes Risk
Diabetes RiskDainik Gomantak

Diabetes Risk: मधुमेहामुळे इतर अनेक आजारांचा धोकाही वाढतो. दिवसेंदिवस देशात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून ही एक चिंतेची बाब आहे. लहान मुलं आणि तरुणांमध्येही हा आजार वाढत आहे. शहरी भागात तर परिस्थिती आणखी बिकट आहे.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि लाइफस्टाइलमुळे मधुमेह होतो असे मानले जाते, पण तुम्हाला माहीत आहे का की काही व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे देखील या आजाराला बळी पडू शकता.

इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या अहवालात असे म्हटले आहे की ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते त्यांना मधुमेह आजार होऊ शकतो. शहरी भागातील लोकांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता खधिक असते. ज्याचा थेट परिणाम मधुमेहाच्या रूग्णांमध्ये होतो.

काम करणारे लोक सकाळी ऑफिसला जातात आणि रात्री घरी येतात, असे या अहवालात म्हटले आहे. या काळात त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही.

त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी कमी होऊ लागते. जे लोक त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यांच्यातही या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते.

मधुमेहाचे लक्षण कोणते

  • सारखी लघवी येणे

  • सारखी भुक लागणे

  • थकवा जाणवणे

  • जखम लवकर न बसणे

Diabetes Risk
Solo Travel Tips: सोलो ट्रिपला जाण्याचा प्लॅन करताय? मग 'या' चुका टाळा

इन्सुलिनची पातळी सामान्य राहते

द लॅन्सेट जर्नलच्या अहवालानुसार, व्हिटॅमिन डी शरीरात इन्सुलिनची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील जळजळही कमी होते. त्यामुळे मधुमेहाचा धोका देखील कमी होतो.

ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी निर्धारित मानकांपेक्षा कमी आढळते, त्यांच्या शरीरातील इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे साखरेची पातळी वाढून मधुमेह होण्याचा धोका असतो.

मधुमेह कसा टाळावा

तज्ज्ञांच्या मते मधुमेह आजार टाळण्यासाठी शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळीही चांगली असली पाहिजे. व्हिटॅमिन डी साठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सकाळचा हलका सूर्यप्रकाश देखील फायदेशीर असतो.

याशिवाय तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. फास्टफुडपासून दूर राहावे. तसेच व्यायाम करून देखील मदुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com