Solo Travel Tips: सोलो ट्रिपला जाण्याचा प्लॅन करताय? मग 'या' चुका टाळा

सोलो ट्रिपला जाताना काही छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची ट्रिप अविस्मरणीय होऊ शकते. यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Solo Travel Tips
Solo Travel TipsDainik Gomantak

काही लोकांना फिरण्याची इतकी आवड असते की ते एकटेच ट्रिप प्लॅन करतात. ते अनेकदा प्रवासासाठी निमित्त शोधतात आणि सोलो ट्रव्हलिंग करायला पसंती देताता. सोलो ट्रिपचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही संपूर्ण जग एक्सप्लोर करू शकता. पण सोलो ट्रिप अविस्मरणीय बनवायची असेल तर तुम्हाला काही छोट्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहेे.

  • लोकल स्कॅमपासून सावध

स्कॅम कधीही आणि कुठेही होऊ शकतात. स्थानिक चोर लोकांची खास करून पर्यटकांची फसवणूक करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. पण जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्हीही फसवणुकीला बळी पडू शकता. म्हणूनच तुम्हा ज्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात तेथील स्कॅमबद्दल ऑनलाइल शोध घ्यावा. यामुळे तुमची फसवणुक होणार नाही.

  • ट्रिपची कोणालाही माहिती न देणे

अनेक वेळा लोक कोणालाही सांगता फिरालयला जातात. कधी कधी काही कारणांमुळे ते संपर्काच्या बाहेरही होतात. पण ही एक मोठी चूक असू शकते. यामुळे सोलो ट्रिपवर जाताना घराच्यांना सांगून जावे.

  • प्लॅनिंग करणे

जर तुम्ही कधीही सोलो ट्रिपला गेले नसाल, तर ट्रिपला जाण्यापूर्वी काही तयारी करणे फार महत्वाचे आहे. अनेक वेळा लोक फक्त बाहेर पडतात आणि मग त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुठे जायचे आहे यासारख्या गोष्टींचे प्लॅनिंग करावे.

  • सार्वजनिक वाय-फाय वापरणे

सार्वजनिक वाय-फाय वापरणे ही एक सामान्य चूक आहे. पण खरं तर असे चुकूनही करू नका. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमचा वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने रूम बुक करत असाल किंवा कोणत्याही वेबसाइटवर साइन इन करत असाल तर तुमची महत्त्वाची माहिती लीक होऊ शकते.

  • मॅप न वापरणे

सोलो ट्रिपला जाताना नेहमी मॅपची मदत घ्यावी. यामुळे तुम्हाला खुप मदत होईल. ज्या ठिकाणी जाणार आहात तेथील रस्ते समजून घ्यावे. यामुळे तेथील ठिकाणे फिरण्यास तुम्हाला मदत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com